Take a fresh look at your lifestyle.

कंगणाची टीवटीव सुरूच ; म्हणे, जर मी डॉन असते तर…

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही महिन्यांपासून सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. नुकतंच दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत मतं व्यक्त केल्यामुळे ती वादात अडकली आहे. तिच्या विधानांमुळे ती सध्या प्रचंड ट्रोल होत आहे. दिलजीत दोसांझ ,मिक्का सिंह आणि भोजपूरी अभिनेता खेसारी लाल यादव यांच्याशी नुकताच कंगनाने पंगा घेतला आहे.

याबाबत कंगनाने नवं ट्वीट केलं आहे. कंगना स्वत:ला हॉटेस्ट टार्गेट म्हणवून घेते. कंगनाने ट्वीटमध्ये लिहीलं आहे, ‘मी सध्याची हॉटेस्ट टार्गेट आहे. मला टार्गेट केलं की तुम्ही मीडियामध्येही प्रसिद्ध व्हाल, मूव्ही माफिया तुम्हाला मोठ-मोठे रोल देतील, तुम्हाला नव्या फिल्म मिळतील, फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड्स दिले जातील.’ पुढे उपरोधित स्वरात ती लिहीते, ‘जर मी डॉन असते तर 27 प्रदेशांचे पोलीस माझ्या मागे लागले असते.’ कंगनाने या ट्वीटमधून अनेकांचा नाव न घेता समाचार घेतला आहे.

कंगनानं शेतकरी आंदोलनाबाबत प्रतिक्रिया दिल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यावर नाराजी दर्शवली. त्यावेळी दिलजीत दोसांझनंदेखील कंगनाला टार्गेट केलं होतं. तेव्हापासून त्यांच्यामध्ये Twitter War चांगलंच रंगलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.