Take a fresh look at your lifestyle.

कंगना म्हणते, 100 कोटी रुपये बजेटचा सिनेमा घेऊन मी बॉलिवूड वाचवायला येतेय

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना नेहमीच ताशेरे ओढताना दिसते. तिचा एकहि दिवस असा जात नाही की, त्यादिवशी तिनं टीका करीत कुणाला ओरबाडले नाही. सातत्यानं वादाच्या भोव-यात अडकणारी कंगना एका नव्या चित्रपटासोबत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. दरम्यान प्रमोशन साठी ती काही ना काही ट्विट करते. त्यांतील एका ट्विट मध्ये बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर व आदित्य चोप्रा यांवर तिने जोरदार टीका केली आहे. त्यात १०० कोटी रुपये बजेटचा सिनेमा घेऊन मी बॉलीवूडला वाचवायला येतेय असे कंगना म्हणाली.

एखादा विषय अमान्य असल्यास, कंगना कोणत्याही प्रसिध्द सेलिब्रेटीवर किंवा राजकारण्यावर टीका करायला चुकत नाही. गेल्या आठवड्यात तिचा आगामी चित्रपट थलाइवीचा ट्रेलर नुकताच रिलिज झाला आहे. काही तासांतच त्या ट्रेलरला कोट्यवधी व्ह्युज मिळाले. हा चित्रपट तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल. त्यामुळे प्रोमोशनची जोरदार तयारी सुरु आहे.

आपल्या म्हणण्यावर नेहमीच ठाम उभ्या राहणाऱ्या बेधडक कंगनाची हा अंदाज तिच्या चाहत्यांना भलताच भावतो. एकदा का तिने एखाद्या विषयावर प्रतिक्रिया द्यायचे ठरवले कि पुन्हा माघार नाही असा तिचा अविर्भाव असतो. सध्या थलायवी या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे ती कौतुक आणि शाबासकीची थाप मिळवीत आहे. कोविड-१९ च्या बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे, अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यानंतर काही निर्मात्यांनी आपल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कंगनाने त्याला विरोध केला असून तिचा थलाईवी चित्रपट हा २३ एप्रिल २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान ट्रेंड अॅनालिस्ट तरण आदर्शनं यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये, कंगणाच्या थलाईवी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख काही केल्या बदलणार नाही”, असे लिहिले होते. त्यावर करण जोहर आणि आदित्य चोप्रा यांनी तिच्यावर नेमून निशाणा साधला. त्यानंतर थांबेल किंवा गप्प बसेल ती कंगना कुठली? त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता बॉलीवूडचे ठेकेदार म्हणत, तिने करण जोहर आणि आदित्य चोप्राची पुन्हा एकदा दाणादाण उडवली आहे. काही झालं तरी मी त्यांची आई आहे. असंही कंगणा त्यांना म्हणाली आहे.

“त्या लोकांनी मला इंडस्ट्रीमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. आपले वेगळे गट तयार केले. मला त्रास दिला. आज बॉलीवूडचे ठेकेदार करण जोहर आणि आदित्या चोप्रा हे लपत आहेत. सगळे मोठे हिरो लपत आहेत. केवळ कंगना सर्वात पुढे असून तिच्या टीमसह 100 कोटी रुपये बजेटचा सिनेमा घेऊन बॉलिवूड वाचवायला येतेय”, असे कंगनाने आपल्या व्टिटमध्ये लिहिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.