हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | सुशांत आत्महत्या प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक युद्ध रंगल आहे. तेच आता कंगणाला चांगलंच महागात पडत आहे. कंगनाच्या मुंबईतील ऑफिसमध्ये मुंबई महपालिकेचे अधिकारी आले आहेत. कोणतीही नोटीस न देता बीएमसी अधिकारी आपल्या ऑफिसमध्ये जबरदस्ती घुसल्याचा आरोप कंगनाने केला आहे. कंगनाने याचा व्हिडीओही आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
कंगनाने ट्वीट केलं आहे, “बीएमसी अधिकारी जबरदस्ती माझ्या ऑफिसची तपासणी करत आहे. जेव्हा शेजाऱ्यांनी याबाबत विचारणा केली, तेव्हा त्यांनी त्यांचाही छळ केला. ‘त्या ज्या मॅडम आहे त्यांनी जे काही केलं आहे, त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील’, अशी भाषा त्यांनी वापरली”
https://twitter.com/KanganaTeam/status/1302903789339340800?s=20
कंगना पुढे म्हणाली, “माझ्याकडे या कार्यालयाची सर्व कागदपत्रं, बीएमसीची परवानगी आहे. माझ्या संपत्तीत काहीही बेकायदेशीर नाही. तसं काही असेल तर बीएमसीने बेकायदेशीर बांधकामाची नोटीस पाठवायला हवी होती. मात्र कोणत्याही नोटिशीशिवाय त्यांनी माझ्या जागेवर छापा टाकला आहे आणि उद्या ते सर्वकाही उद्ध्वस्त करतील”
दरम्यान, कंगना विरुद्ध शिवसेना वादात केंद्रीय गृहमंत्रालयाने कंगनाला आता Y प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. Y दर्जाच्या सुरक्षेमध्ये एकूण 11 सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. यात दोन कमांडो तैनात असतात. ही सुरक्षा 24×7 असते. आता ही सुरक्षा व्यवस्था थेट सीआरपीएफ सांभाळू शकते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’