Take a fresh look at your lifestyle.

भावाच्या लग्नानंतरच येणार ; मुंबई पोलिसांच्या समन्सला कंगनाचं उत्तर

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत तिच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. देशद्रोहाच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांना पोलिस ठाण्यात हजर होण्यासाठी समन्स बजावले होते, परंतु आपल्या भावाच्या लग्नकार्यात व्यस्त असल्याचं सांगत दोघांनीही पोलीस ठाण्यात हजर राहण्यास नकार दिला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा कंगना आणि रंगोली या दोघांनाही समन्स पाठवलं होतं. तसंच १० नोव्हेंबरपर्यंत वांद्रे पोलीस स्थानकात हजर होण्यास सांगितलं होतं. परंतु पुन्हा एकदा त्या दोघींनी याला नकार दिला.

आपल्या भावाच्या लग्नानंतरच आपण पोलिसांसमोर हजर राहू शकतो, असं दोघांकडून सांगण्यात आलं आहे. कंगना रणौत आणि रंगोली चंदेल यांनी कथितरित्या सोशल मीडियावर महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस आणि मुंबईवर केलेल्या टीकेवरून त्यांना हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते.

वांद्रे पोलिसांनी 21 नोव्हेंबर रोजी कंगना रनौत आणि तिची बहीण रांगोळी यांना प्रथम नोटीस पाठविली होती आणि निवेदन नोंदवण्यासाठी वांद्रे पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितले. पण यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्रीच्या वकिलाने सांगितले की, सध्या कंगना हिमाचल प्रदेशात आपल्या भावाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे, यामुळे ती अद्याप हजर होऊ शकत नाही. यानंतर, मुंबई पोलिसांनी दोन्ही बहिणींना 10 नोव्हेंबरला पोलिस ठाण्यात हजर होण्यास सांगितले, पण कंगनाने हा प्रस्ताव देखील स्वीकारला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.