Take a fresh look at your lifestyle.

सुशांतच्या वाढदिवसाच्या दिवशी कंगणाने करण जोहर, महेश भट्टवर साधला निशाणा, म्हणाली की….

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा आज वाढदिवस. सुशांतच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचे नातेवाईक आणि चाहते त्याच्या आठवणींना उजाळा देत आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. दरम्यान बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतने आज सुशांतची आठवण काढताना पुन्हा एकदा दिग्दर्शक करण जोहर आणि महेश भट्ट यांच्यावर निशाणा साधला.

कंगनाने आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘डिअर सुशांत, मुव्ही माफियांनी तुझ्यावर बंदी घातली, तुला त्रास दिला.. सोशल मीडियावर तू अनेकदा मदत मागितली. मला आजही वाईट वाटतं की मी तुला साथ देऊ शकले नाही. तू स्वतः त्या माफियांविरोधात लढू शकतोस हा विचार मी करायला नको होता. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.’

यानंतर, कंगनाने अजून ट्वीट केलं आणि म्हणाली, ‘हे विसरू नका की सुशांतने यशराज फिल्म्सने त्याच्यावर बंदी घातल्याचं म्हटलं होतं. करण जोहरने त्याला मोठी स्वप्नं दाखवली आणि त्याला फ्लॉप सिनेमे दिले. यानंतर, जगभरात सुशांत हा एक फ्लॉप अभिनेता आहे असं सांगत फिरला. हे विसरू नका की महेश भट्ट यांची सर्व मुलं डिप्रेशनमध्ये होती. पण तरीही ते सुशांतसाठी म्हणायचे की त्याचा परवीन बाबीप्रमाणे मृत्यू होईल. या सर्व लोकांनी मिळून सुशांतला मारलं आणि सुशांतने स्वत: सोशल मीडियावर या सगळ्या गोष्टी लिहिल्या होत्या. हे कधी विसरू नका..

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.