Take a fresh look at your lifestyle.

उर्मिलाजी जर मी तुमच्याइतकी हुशार असते तर काँग्रेसला सपोर्ट केला असता ; कंगनाचा टोला

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री कंगणा राणावत आणि उर्मिला मातोंडकर यांच्यातील वाद काही नवा नाही. गेल्या काही दिवसांपासून एकमेकांनावर टीका टिप्पणी करण्याची एकही संधी त्या सोडत नाहीत. आता नुकतीच कॉंग्रेस सोडत शिवसेनेत रुजू झालेल्या उर्मिला मातोंडकर यांनी नवीन कार्यालय खरेदी केले आहे. त्यांनी तीन कोटींचे नवीन कार्यालय घेतले आहे. आता कंगना रनौतने तिच्या नवीन ऑफिसला लक्ष्य केले आहे. कंगनाने एक व्हिडिओ ट्विट केला आहे. व्हिडिओ सोबत कंगनाने उर्मिलाला चांगलेच वेठीस धरले आहे.

कंगना म्हणाली. भाजपला पाठिंबा देऊन माझा काही उपयोग नाही, पण कॉंग्रेसमुळे उर्मिलाला खूप फायदा झाला आहे. ट्विटमध्ये मध्ये कंगनाने लिहिले, ‘उर्मिला जी मी स्वत: च्या मेहनतीने घरे बांधली होती, कॉंग्रेस त्यांना तोडत आहे. भाजपाला खुश करण्यासाठी माझ्यावर फक्त २०-२५ केस आहेत. माझी अशी इच्छा आहे की मी तुमच्या इतकी हुशार असते आणि कॉंग्रेस सोबत आले असते. खरच मी मूर्ख आहे. असा टोला कंगनाने उर्मिलाला लगावला आहे.

कंगना रनौतचे ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहे. कंगनाच्या या ट्विटला अजूनही उर्मिला यांनी प्रतिउत्तर दिले नाही उर्मिला कंगनाच्या या ट्विटला काय उत्तर देतात हे पाहण्याजोगे ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.