Take a fresh look at your lifestyle.

कंगणा दिसणार जयललिता यांच्या भूमिकेत ; या दिवशी प्रदर्शित होणार ‘थलायवी’

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेत्री कंगना रनौतची (Kangana Ranaut) मुख्य भूमिका असलेला आणि राजकीय नेत्या जयललीता यांच्या जीवनावर आधारित असलेला थलायवी (Thalaivi) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जयललिला यांच्या ७३व्या जयंतीच्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्यांचा जीवन प्रवास उलगडणार आहे. या चित्रपटात कंगना जयललिता यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही महिती कंगना रनौतने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे.

अनेकजन हा चित्रपट पाहण्यासाठी उस्तुक आहेत. मात्र, आता या चित्रपटासंदर्भातील प्रेक्षकांची उत्सुकता आता संपणार आहे. कारण हा चित्रपट येत्या एप्रिलमध्ये जयललीता यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 एप्रिलला देशभरात प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट एकाच वेळी वेगवेगळ्या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तेलुगु आणि तमिळ या भाषांमध्ये थलायवी चित्रपट प्रदर्शित होणा आहे.

कंगना राणौतने ट्विट करत लिहिले की, जय अम्मा यांच्या जयंतीला…२३ एप्रिल, २०२१ ला चित्रपटगृहात दिग्गज व्यक्तीच्या कथेचा साक्षीदार बना. थलाइवी हिंदी, तमीळ आणि तेलगू या भाषेत रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए. एल. विजयने केले आहे आणि यात अरविंद स्वामी, प्रकाश राज, मधू आणि भाग्यश्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात जयललिता यांचा अभिनयाच्या कारकीर्दीपासून राजकीय प्रवास रेखाटण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.