Take a fresh look at your lifestyle.

कंगनाला खटकला दीपिकाचा ‘गहराइया’; म्हणाली, पॉर्नोग्राफीसारखा वाटतो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। धर्मा प्रोडक्शन्स, व्हायकॉम 18 आणि शकुन बत्रा जोउस्का फिल्म्स यांची सहनिर्मिती असलेला ‘गहराइया’ हा चित्रपट ११ फेब्रुवारी २०२२ रोजी जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये अमेझॉन प्राइम व्हिडियोवर प्रदर्शित झाला. यानंतर या चित्रपटावर अनेकांनी चांगल्या तर अनेकांनी वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये आता बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रनौतने केलेली कमेंट बऱ्याच लोकांना खटकली आहे. तर अनेकांनी तिच्या बोलण्याचे समर्थन केले आहे. अमेझॉन प्राइम व्हिडियोवर प्रदर्शित झालेल्या ‘गहराइया’ या चित्रपटाबाबत बोलताना कंगनाने हा चित्रपट पॉर्नोग्राफीसारखा वाटतो असे म्हटले आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी हे मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

 

कंगना रनौतने दीपिका आणि सिद्धांतच्या ‘गहराइया’ या चित्रपटावर निशाणा साधताना मनोज कुमार यांच्या चित्रपटातील हिमालय की गोद मधील गाणं चाँद सी महबूबा हे गाणे शेअर केले आहे. यासोबत कंगनाने लिहिले कि, मी सुद्धा याच पिढीतली आहे. पण या प्रकाराच्या रोमान्सचा प्रकार मला समजतो. कृपया नवीन पिढी/युवा/शहरी चित्रपटांच्या नावाने कचरा विकू नका. कारण वाईट चित्रपट हे वाईट चित्रपटच असतात. कोणतेही अवयव प्रदर्शन किंवा अगदी पोर्नोग्राफी ते वाचवू शकत नाही.. हे एक मूलभूत सत्य आहे, यात काहीही ‘गहराइया’ (खोल) नाही. अशा आशयाचे कॅप्शन देत ‘गहराइया’ चित्रपटावर कंगनाने निशाणा साधला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

दीपिकाचा ‘गहराइया’ हा चित्रपट खराब दर्जाचा असल्याचे म्हणत कंगनाने पुन्हा एकदा वाद ओढवून घेतलाय असे दिसत आहे. कारण, कंगनाने ‘गहराइया’ या चित्रपटाची तुलना थेट पोर्नोग्राफीबरोबर केली आहे. यामुळे दीपिका आणि सिद्धांतचे चाहते कंगनाला ट्रोल करताना दिसत आहेत. पण दुसरीकडे कंगना रनौतच्या याच वक्तव्यामुळे दीपिकाचा ‘गहराइया’ चित्रपट होता त्यापेक्षा जास्तच चर्चेत आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कंगना मॅडमचा उत्साह कदाचित मावळला असेल, असे म्हणायला काही हरकत नाही.