Take a fresh look at your lifestyle.

कांद्याने केला कंगनाचा वांदा; नैवेद्याच्या थाळीत कांदा वाढल्यामुळे झाली ट्रोल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नवरात्रीच्या मुहूर्तावर दुर्गाष्टमीच्या दिवशी घराघरात पंचपक्वान शिजवले जाते. गोडा धोडाचे नैवेद्य देवीला दाखविले जातात. यानिमित्ताने कंगना रनौतने नैवेद्याच्या थाळीचा एक फोटो शेअर केला. हा फोटो बघताच लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. कंगनाने नैवेद्याच्या ताटात कांदा वाढला होता. हे पाहून लोक भडकले आणि याचा परिणाम म्हणजे ट्रोलिंग. लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स करून कंगनाला ट्रोल केले. मात्र इथे गप्प बसली तर ती कंगना नाहीच. तिनेही लोकांची तोंड बंद होतील असे उत्तर दिले आहे.

कंगनाच्या घरी दुर्गाष्टमीची पूजा झाली. यावेळी विविध पक्वानांनी सजलेल्या नैवेद्याच्या थाळीचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला. या थाळीत शिरा, पुरी, रायता, छोले आणि सोबत कांदा आणि मिरची असे विविध पदार्थ होते. हा फोटो शेअर करत, कंगनाने चाहत्यांना अष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. ‘अष्टमीचे व्रत असेल आणि घरी प्रसादाची अशी सजलेली थाळी असेल तर…,’ असे तिने हा फोटो शेअर करताना कॅप्शन लिहिले. मात्र हा फोटो शेअर केल्याने कंगनावर ट्रोल व्हायची पाळी आली. जी इतरांना रोस्ट करते ती स्वतःच काल रोस्ट झाली.

 

लोकांनी कमेंट करीत कंगनाची चांगलीच शाळा घेतली. दीदीजी, अष्टमीला कांदा वर्ज्य आहे, असे एका युजरने लिहिले. मैया के भोग में प्याज का क्या काम? असे म्हणत एका युजरने आपला राग व्यक्त केला आहे. तर एका युजरने चक्क नवरात्रात कांदा कोण खातं? कशी हिंदू आहेस तू? असा खडा सवाल कंगनाला केला. ‘तुम्हारी हरकत बता रही है, तुम्हारा मजहब नया नया है,’ असेही एका युजरने लिहिले आहे. हे असे आणि एवढे टट्रोल झाल्यावर कंगना शांत बसून कशी राहणार? मग काय तिनेही प्रश्नांचे उत्तर अगदी सविस्तररित्या दिले. ‘हमारा मजहब बडा फ्लेग्जिबल है जी. बंगाल में तो दुर्गा पूजा में प्याज ही नहीं मीट और मछली भी खा सकते है… कोई फतवा नहीं जी… ऐश करो ऐश’, असे म्हणत तिने ट्रोलर्सला गप्प करण्याचा प्रयत्न केला.

Leave A Reply

Your email address will not be published.