Take a fresh look at your lifestyle.

कंगना रनौत v/s जावेद अख्तर मानहानी खटला; न्यायालयाने अजामीन पात्र वॉरंटची मागणी पुन्हा फेटाळली

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही प्रकरण अशी असतात जी संपता संपत नाहीत. जसे कि, जावेद अख्तर v/s कंगना रनौत. होय. ज्येष्ठ पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये अंधेरी न्यायालयात अभिनेत्री कंगना रनौतच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर आज २०२२ उजाडला पण या केसचा काही निकाल लागला नाही. सध्यातरी अख्तरांकडून न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळल्याची बातमी समोर येत आहे.

एएनआय मीडिया रिपोर्टनुसार, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. यानंतर अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटसमोर येत्या ०१ फेब्रुवारी २०२२ रोजी या केसची पुढील सुनावणी होणार आहे. याबाबतची पूर्ण माहिती गीतकार जावेद अख्तर यांचे वकील जय भारद्वाज यांनी माध्यमांसोबत बोलताना दिली आहे.

त्याचे झाले असे कि गीतकार जावेद अख्तर यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९ (मानहानी) आणि ५०० ​​(बदनामीची शिक्षा) अंतर्गत कंगना रनौत विरुद्ध तक्रार दाखल केली होती. जावेद अख्तर यांनी २०२० सालामध्ये अंधेरी न्यायालयात अभिनेत्री कंगना रनौत विरुद्ध तक्रार केली होती. या तक्रार अर्जामध्ये अभिनेत्रीने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीचा उल्लेख करण्यात आला होता. ज्यामध्ये तिने कथितपणे अख्तर यांच्याविरुद्ध बदनामीकारक विधाने केली आहेत आणि त्याचा संबंध अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी जोडला होता.