Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कंगनाचे इंस्टाग्राम अकाउंट झाले हॅक; तालिबान्यांसंदर्भात लिहिलेल्या पोस्ट झाल्या नष्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 19, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हि आपल्या धाकड व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर इतकी सक्रिय आहे कि राष्ट्रातील कोणत्याही मुद्द्यांवर व्यक्त होण्यासाठी ती याचा सर्रास वापर करताना दिसते. तिने मांडलेल्या सर्व विचारांना तिचे चाहते मोठ्या संख्येने समर्थन करतात तर अनेक लोक तिला ट्रोलदेखील करतात. अशी ह्या ना त्या कारणामुळे कंगना सारखी चर्चेत असते. मात्र यावेळी एका विचित्र समस्यांमुळे कंगना चर्चेत अली आहे. सोशल मीडियावर तेढ निर्माण करणारे व आपत्तीपूर्वक भाषा वापरणाऱ्या कंगनाचे ट्विटर अकाऊंट एका वादग्रस्त ट्विटमुळे निलंबित करण्यात आले. त्यानंतर कंगना थेट इंस्टाग्रामवर सक्रिय झाली आणि इथे व्यक्त होऊ लागली. मात्र इंस्टाग्रामवर एका वेगळ्याच समस्येला तिला तोंड द्यावे लागत आहे. तिचे अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे तिला स्वतःच्याच अकाऊंटवर पोस्ट लिहिण्यासाठी बहिणीच्या फोनचा वापर करावा लागत आहे. दरम्यान तिने तालिबान्यांसंदर्भात केलेल्या पोस्ट देखील नष्ट झाल्याचा तिने दावा केला आहे.

याविषयी सांगताना तिने लिहिले आहे की,”काल रात्री चीनमधून माझं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न झाला. तसा इंस्टाग्राम अलर्ट मला मिळाला, पण तो लगेचच नाहीसा झाला. आज सकाळी जेव्हा मी जेव्हा अकाऊंट पाहिलं तेव्हा त्यावरून तालिबान्यांसदर्भातील सर्व पोस्ट नष्ट झाल्या होत्या. माझं अकाऊंट डिसॅबल झालं होतं. यासंदर्भात इंस्टाग्रामसोबत बोलल्यानंतर मला माझं अकाउंट वापरता येत आहे. परंतु मी काही लिहिण्याचा प्रयत्न करते, तेव्हा अकाऊंट लॉगआऊट होतं. हे असं वारंवार होत आहे.”

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

पुढे म्हणाली, ”ही स्टोरी लिहिण्यासाठी मला माझ्या बहिणीचा फोन वापरावा लागत आहे. हे खूप मोठं आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे,” असे लिहीत कंगनाने याविषयी माहिती दिली आहे. अलीकडेच कंगनाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर खूप दिवसांनी स्वतःचे काही फॅब लूक मधले ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो तिच्या अनेको चाहत्यांना प्रचंड आवडले. तर काही लोकांना मात्र तिचा हा ग्लॅमरस लूक भाळलादेखील नाही आणि आवडलाही नाही. अर्थात सोशल मीडियावर उमटलेल्या प्रतिसादावरून हे लक्षात येत आहे. माहितीनुसार, अभिनेत्री कंगना रनौत सध्या बुडापेस्ट येथे ‘धाकड’ या तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करतेय.

Tags: Bollywood ActressInstagram AccountInstagram PostKangna RanautSocial Media Account Hacked
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group