Take a fresh look at your lifestyle.

MP इलेक्शनसाठी कंगनाचे योगी आदित्यनाथ यांना समर्थन; व्हिडीओतून केले वोट अपील

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। उत्तर प्रदेशात उद्यापासून तिसऱ्या टप्प्यातील मतदानास सुरुवात होत आहे. यासाठी अनेक पक्षांची धडधड वाढली असून जो तो जिंकण्याच्या दृष्टीने प्रयत्नांत आहे. यासाठी सत्ताधारी पक्षासह विरोधकांनी ताकद लावल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी आता बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतने पहिल्यांदाच आपली पक्षबाजू दर्शविली आहे. कंगनाने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि यामध्ये ती यूपीच्या लोकांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन करताना दिसते आहे. तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे आणि अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

आजपर्यंत बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने इतक्या उघडपणे कोणत्याच पक्षाला समर्थन दर्शविले नव्हते मात्र आता थेट अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडीओ शेअर करून तिने बीजेपी साथीचे समर्थन दर्शवले आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कंगना म्हणाली, “आपल्याला आपल्या आवडत्या योगी सरकारला परत आणायचे आहे.” या व्हिडिओमध्ये अभिनेत्री कंगना रनौत बोलताना दिसतेय कि, आपल्या सर्वांना माहित आहे की उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकीत कुरुक्षेत्रात आपले एकमेव हत्यार मतदान आहे. लक्षात ठेवा आपल्याला आपल्या आवडत्या योगी सरकारला परत आणायचे आहे. त्यामुळे भरपूर मतदान करा. मतदान करायला जाताना तीन ते चार जणांना सोबत घेऊन जा आणि मतदान करा. सोबतच लक्षात ठेवा विजयाचा हा विक्रम मोडता कामा नये आणि एकही मत चुकता कामा नये! जय श्री राम.”

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हि थेट आणि वादग्रस्त वक्तव्य कारण्यासाठी ओळखली जाते. याआधी अनेकदा ती अनेक वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे आणि तितकीच ट्रोलदेखील झाली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले कि, ताई तू युपीची तर नाही आहेस मग तुला काय त्रास आहे..? तर अन्य एकाने लिहिले सगळी मोहमाया आहे.. सगळा पैशाचा खेळ आहे. तर अन्य एकाने लिहिले कि, वोट कुणाला जाणार आणि कोण जिंकणार हे ठरलेलं आहे. याशिवाय आणखी एकाने लिहिले कि, गंगा नदीमध्ये एव्हडे मृतदेह सापडल्यानंतर विचार तर करावा लागेल ना ताई.