Take a fresh look at your lifestyle.

रबने बना दी जोडी..! अखेर कनिका गौतमची झाली..; लंडनमध्ये पार पडला हटके विवाह सोहळा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ‘बेबी डॉल’ या गाण्याच्या माध्यमातून आपल्याला वेड लावणारी प्रसिद्ध बॉलिवूड गायिका कनिका कपूर हीचे लग्न झाले आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड गौतम याच्यासोबत लग्न गाठ बांधली आहे. काल अर्थातच २० मे २०२२ रोजी शुक्रवारी कनिका आणि गौतम यांनी लग्न गाठ बांधली आहे. तिच्या मेहंदी आणि हळदीच्या समारंभाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असताना आता तिच्या लग्न सोहळ्यातील खास फोटो देखील व्हायरल होत आहेत.

कनिका कपूर तिच्या लग्न सोहळ्यात अतिशय सुंदर दिसत होती. तिचा विवाह सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीने लंडन येथे पार पडला. गायिका कनिका कपूर हिने तिचा बॉयफ्रेंड गौतम हाथीरमानी याला अनेक दिवस डेट केल्यानंतर अखेर आता लग्नगाठ बांधली आहे. तिच्या हळदी- मेहेंदी समारंभाच्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होतीच. यानंतर आता त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गौतम हा एनआरआय उद्योगपती असल्यामुळे त्यांचे लग्न लंडनमध्ये झाले. पण सर्व विधीनुसार त्यांनी लग्न केल्याचे समजत आहे

कनिकाने मेहंदी आणि लग्नाचे फोटो सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केले होते. सोबत कॅप्शनमध्ये आय लव्ह यु असेही लिहिले होते. यानंतर अजूनतरी तिने लग्नाचे फोटो शेअर केलेले नाहीत. मात्र बॉलिवूड पँपराझींनी हे फोटो शेअर केले आहेत आणि हे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुख्य म्हणजे, गायिका कनिका कपूर हि तिचा बॉयफ्रेंड गौतम हाथीरमानीसोबत करत असलेलं लग्न हे तीच दुसरं लग्न आहे.

याआधी तीच एक लग्न होऊन गेलं आहे. तिचं पहिलं लग्न १९९८ सालामध्ये व्यावसायिक राज चंदोकसोबत झालं होतं. पुढे काही वादांमुळे तिने २०१२ साली राज चंदोकपासून घटस्फोट घेतला. पण तिला या नात्यातून तीन मुलं आहेत आणि आज यशस्वी गायिका असण्यासोबत ती एक उत्तम आई देखील आहे. तब्बल १० वर्षानंतर आज ती पुन्हा एकदा नव्या आयुष्याची स्वप्न पाहतेय.