Take a fresh look at your lifestyle.

कन्नड सिनेसृष्टीवर शोककळा; प्रसिद्द अभिनेत्याचे किडनीच्या गंभीर आजराने निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीतीळ अनेक दिग्गज कलाकार मंडळींनी जगाचा निरोप घेतल्याचे दिसून आले. यामुळे कलाविश्वात दुःखाचे वातावरण आहे. अशातच आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेते राजेश यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. शनिवारी १९ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांचे निधन झाले आहे. दरम्यान ते ८९ वर्षांचे होते. किडनी खराब झाल्याने आणि वाढत्या वयाशी संबंधित आजाराने राजेश यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. या बातमीमुळे संपूर्ण कन्नड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड अभिनेते राजेश याना अगदी १० दिवसांपूर्वीच म्हणजेच ९ फेब्रुवारी २०२२ रोजी अस्थिर वाटू लागले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. वय पाहता काळजीच्या दृष्टीने त्यांना तातडीने बंगळुरू येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार सुरु होते. ते उपचारांना प्रतिसाददेखील देत होते. मात्र, अखेर शनिवारी काळ लोटला आणि पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास राजेश यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात ५ मुले आहेत.

 

कन्नड अभिनेते राजेश यांचा जन्म १५ एप्रिल, १९३२ रोजी बंगळुरू येथे झाला होता. त्यांचे मूळ नाव मुनी चौडप्पा होते. त्यांनी कमी वयात थिएटरमध्ये काम केले. त्यांचे स्टेज नाव विद्यासागर होते. राजेश यांचा स्वत:चा थिएटर ग्रूप होता ज्याचं नाव शक्ति ड्रामा बोर्ड असे होते. यानंतर कानाआड सिनेसृष्टीत त्यांनी १५० हून अधिक सिनेमात काम केल. ‘विष सरपा’, ‘नंदा दीपा’, ‘चंद्रोदय’ आणि ‘कित्तूर राणी चेन्नम्मा’ ही त्यांची काही लोकप्रिय नाटके आहेत. तर १९६३ साली प्रदर्शित झालेला ‘श्री रामांजनेय युद्ध’ या सिनेमातून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती.