Take a fresh look at your lifestyle.

‘द काश्मीर फाईल्स’च्या प्रमोशनसाठी कपिल शर्माने दिला नकार..?; दिग्दर्शकाच्या आरोपाने खळबळ  

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित द काश्मीर फाईल्स हा चित्रपट येत्या ११ मार्च २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होऊ घातला आहे. दरम्यान चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी निर्माते आणि दिग्दर्शक विविध रिऍलिटी शोजच्या माध्यमातून आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतात. कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’देखील याचसाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये विविध कलाकार आपले चित्रपट घेऊन प्रमोशनसाठी येत असतात. परंतु कपिल शर्माने द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला आहे. असा आरोप दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केलाय. यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कपिलवर राग व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

त्याच झालं असं कि, एका व्यक्तीने काश्मीर फाईल्स चित्रपटाचं प्रमोशन कपिल शर्मा शो मध्ये करावं असं म्हटलं आणि त्यावर चित्रपटात स्टार कास्ट नसल्याने बोलवलं नाही, असं अग्निहोत्रीने म्हटलेलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं कि, ‘द कपिल शर्मा शोमध्ये कुणाला बोलवलं जावं, हे मी ठरवू शकत नाही. हे पूर्णपणे कपिल शर्मा आणि शोच्या निर्मात्यांवर अवलंबून आहे. बॉलिवूडबद्दल बोलायचं झालं तर मी एक गोष्ट सांगू इच्छितो की, अमिताभ बच्चन यांनी गांधींजीबद्दल एक वाक्य सांगितलं होतं, ‘वो राजा है और हम रंक’. या शोचा निर्माता सलमान खान असल्यामुळे असून विवेक अग्निहोत्रीने अप्रत्यक्षपणे त्याच्यावर निशाणा साधल्याचे समजत आहे.

‘द कपिल शर्मा शो’मधून रसिकांचं मनोरंजन करणारा कपिल शर्मा आज ट्रोल होताना दिसतोय. याचे कारण म्हणजे काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने यांनी सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून कपिल शर्मावर केलेला आरोप.  कपिलने ‘द काश्मीर फाईल्स’ चे प्रमोशन करण्यास नकार दिला कारण यात बडा कलाकार नाही असे त्यांचे म्हणणे आहे. हे पाहून कपिल सोशल मीडियावर ट्रोल होतोय.

एका यूजरने म्हटलं की, ‘सिनेमात स्टारकास्ट नसल्याने कपिल शर्माने काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या प्रमोशनला नकार दिला आहे. इंडस्ट्रीमध्ये कपिल शर्मा खानच्या किती जवळ आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे.’ तर अन्य एकाने लिहिले कि, ‘हे खरं असेल, तर मी तुझा तीव्र निषेध करतो. जर खरं नसेल तर या चित्रपटाचं कपिल शर्मा शोमध्ये प्रमोशन बघायला आवडेल.’ काहींनी काश्मीर फाईल्स चित्रपट प्रमोट करण्यास कपिल शर्माने नकार दिला असून, शो वर बहिष्कार टाकावा असंही म्हटलं आहे.