Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कपिल शर्माच्या सुरेल आवाजाने आमिर खान झाला मंत्रमुग्ध; सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 8, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Aamir_Kapil
0
SHARES
66
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता आमिर खान सोशल मीडियावर विविध कारणांमुळे चर्चेत असतो. तो स्वतः सोशल मीडियावर फार सक्रिय नसला तरीही नेटकऱ्यांमध्ये त्याची चर्चा असते. याशिवाय प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा त्याची तर वेगळीच हवा आहे. असे हे दोन्ही सेलीब्रिटी नुकतेच एकत्र आले आणि मैफिल जमवताना दिसले. आमिरने ‘द कपिल शर्मा शो’च्या टीमसह काही मंडळींना आपल्या घरी बोलावले होते. या भेटी दरम्यान कपिल शर्माने गुलाम अलींच्या गाण्याची सुंदर मैफिल सुरु केली आणि यामुळे त्यांच्या भेटीची संध्याकाळ सुरेल झाली.

View this post on Instagram

A post shared by Archana Puran Singh (@archanapuransingh)

हा व्हिडीओ कपिल शर्माच्या शोचा अविभाज्य भाग असलेल्या अर्चना पुरन सिंग यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये सर्व पाहुणे मंडळी एका खोलीत बसलेले दिसत आहे. आमिरने ‘कॅरी ऑन जट्टा 3’च्या कलाकारांना आणि ‘द कपिल शर्मा शो’च्या टीमला त्याच्या घरी आमंत्रित केले होते. या भेटीचा अन त्यांच्या पार्टीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये आमिर खान, कपिल शर्मा, सोनम बाजवा, कविता कौशिक, अर्चना पूरन सिंग आणि किकू शारदा यांचा समावेश आहे. यात कपिल शर्मा गुलाम अली यांचे प्रसिद्ध गाणे ‘हंगामा है क्यूं बरपा’ गाताना दिसत आहे आणि सगळे या गाण्याचा आनंद घेत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

या पार्टीत कपिल शर्माने गुलाम अली यांचे गाणे गाऊन एक माहोल तयार केला आहे. त्याच्या गायनाने उपस्थित मंत्रमुग्ध झाल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओवर कपिल शर्मानेही आपली प्रतिक्रिया देत लिहिले आहे कि, ‘किती छान संध्याकाळ होती, या सुंदर आठवणी टिपल्याबद्दल धन्यवाद.’ तर कपिल शर्माने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात कपिल आणि त्याची पत्नी गिन्नी यांचा आमिर खानसोबतचा फोटो दिसत आहे. हे फोटो शेअर करत कपिलने लिहिले आहे की, ‘अद्भुत संध्यकाळ आणि अप्रतिम आदरातिथ्य, प्रेम, हशा, संगीत किती सुंदर भेट आहे यासाठी धन्यवाद. धन्यवाद आमिर खान भाई, तुम्ही आमचा अभिमान आहात. आता लवकरच आमीर खान कपिल शर्मा शो मध्ये दिसला तर आश्चर्य वाटायला नको’.

Tags: aamir khanInstagram Postkapil sharmaViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group