Take a fresh look at your lifestyle.

हॅपी बर्थडे करण जोहर; ‘त्या’ शुटींग दरम्यान नक्की काय घडलं होतं, जाणून घ्या

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणून करण जोहर ओळखला जातो. करणने अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली आहे. आज करण आपला ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याच्यासोबत घडलेला एक अजब किस्सा आपण जाणून घेणार आहोत. ‘कभी ख़ुशी कभी गम’ या सुप्रसिद्ध चित्रपटाच्या शुटींग दरम्यान करण अचानक बेशुद्ध झाला होता. पण कारण काय ते आज जाणून घेऊ 

२००१ साली ‘कभी ख़ुशी कभी गम’ हा पारिवारिक चित्रपट आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिस ते सिनेमा थिएटर खूप चालला देखील होता. यामध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन,शाहरुख खान,काजोल, करीना कपूर, हृतिक रोशन, फरीदा जलाल यांसारखी दिग्गज आणि तगडी स्टारकास्ट होती. या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान हा अजब किस्सा घडला होता.

‘बोले चुडिया’ हे गाणं तेव्हा इतकच आजही प्रसिद्ध आहे. या गाण्याच्या शूटिंग दरम्यान करण जोहरला चक्कर आली आणि तो सेटवर बेशुद्ध झाला होता. डीहायड्रेशनमुळे त्याला ही चक्कर आली होती. तसेच तो अमिताभ बच्चन आणि इतर बड्या स्टारकास्टसोबत काम करत असल्यामुळे फारच नर्व्हस झाला होता. ही गोष्ट त्याने स्वतः एकदा सोशल मीडियावर सांगितली होती.

त्याच्या चक्कर येऊन पडल्यानंतर त्याला विश्रांती साठी एका खोलीत झोपवले होते. पण करण जोहरने त्या खोलीतून वॉकी टॉकीच्या सहाय्याने हे शूटिंग पूर्ण केले होते. कदाचित प्रयत्न फळस्वरूप हे गाणं सुपरहिट झालं होतं. आजही या गाण्यावर तितक्याच उत्साहाने मुली डान्स करताना दिसतात. करणने आपल्या कारकिर्दीत कुछ कुछ होता है, कभी अलविदा ना केहना, माय नेम इज खान सारखे अनेक एका पेक्षा एक हटके आणि दर्जेदार चित्रपट सिनेसृष्टीत ला दिले आहेत.