Take a fresh look at your lifestyle.

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आता करण जोहरची होणार चौकशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी आता निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरची चौकशी होऊन त्याचा जवाब नोंदवला जाणार आहे असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. याआधी  दिग्दर्शक महेश भट्ट यांची तासाभरापेक्षा जास्त चौकशी करण्यात आली. आता निर्माता दिग्दर्शक करण जोहरचाही जबाब नोंदवला जाणार आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे सगळी हिंदी सिनेसृष्टीत खळबळ उडाली होती. मात्र सुशांत सिंह राजपूत हा नेपोटीझम  आणि सिनेसृष्टीतल्या गटबाजीचा बळी ठरला असा आरोपही झाला.

सर्वप्रथम अभिनेत्री कंगना रणौतने या संदर्भात आवाज उठवला होता आणि सुशांत सिंह राजपूत हत्या प्रकरणात करण जोहर आणि महेश भट्ट यांचीही चौकशी करा अशी मागणी तिने केली. दरम्यान सुशांत सिंह राजपूत हा नेपोटीझम  आणि सिनेसृष्टीतल्या गटबाजीचा बळी ठरला का? हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले. दरम्यान या प्रकरणात सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती, अपूर्व मेहता, यांच्यासह तीसपेक्षा जास्त जणांची चौकशी झाली आहे. महेश भट यांचाही जबाब नोंदवला गेला. दिग्दर्शक शेखर कपूर हे मुंबईबाहेर असल्याने त्यांनी मुंबई पोलिसांना त्यांचा जबाब इमेलद्वारे पाठवला आहे.

जेव्हा सुशांतसिंह राजपूत हा घराणेशाहीचा बळी ठरला असं बॉलीवूड मधीलच काही लोक म्हणू लागले.सुशांतच्या मृत्यू नंतर करण जोहरवरच सर्वाधिक टीका झाली. तसंच काही दिवसांपूर्वीच या प्रकरणी महेश भट्ट आणि करण जोहर यांची चौकशी कधी होणार? असा प्रश्न कंगनाने उपस्थित केला होता. अखेर आज करण जोहरची चौकशी केली जाणार आहे त्याचा जबाब नोंदवला जाणार आहे असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. एएनआयने संदर्भातले वृत्त दिले आहे.

Comments are closed.