हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून कलर्स हिंदीवर सुरु असलेला बिग बॉसचा १५ वा सीजन फारच चर्चेत आहे. कधी या घरातली भांडण चर्चेत असतात. तर कधी या घरातली लव्ह स्टोरी. टास्क तर खेळायचं सोडूनच द्या. असे खेळतात जसे काय शेवटचा टास्क आहे. मग मारामारी, तोडफोड, शिवीगाळ सगळंच करतात. खरतर टेलिव्हिजन विश्वातला सर्वात चर्चेत असणारा आणि सर्वात जास्त गाजणार शो म्हणून याकडे पाहिलं जात. आधी या सिजनची लोकप्रियता फारशी नव्हती पण आता हा शो तुफान लोकप्रियता मिळवतो आहे. सध्या सर्वांचे लक्ष्य फक्त ट्रॉफी आहे. त्यात या शोमध्ये एका ज्योतिषाने हजेरी लावली आणि त्याने यावर्षी शोचा विजेता करण कुंद्रा होणार अशी आकाशवाणीच करून टाकली.
शोमध्ये विशेष उपस्थिती लावलेल्या ज्योतिषाने नाव घेतलेला स्पर्धक टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील हँडसम अभिनेता आणि लव्हर बॉय करण कुंद्रा आहे. होय. ज्योतिषाने बिग बॉसच्या या १५ व्या सिजनचा विजेता अभिनेता करण कुंद्रा होणार अशी मोठी भविष्यवाणी केली आहे. ही भविष्यवाणी ऐकून तर स्वतः करण कुंद्राला पण धक्का लागला. पण आनंदाचा धक्का कुणाला आवडत नाही?तसेच त्याचे झाले. करण हि भविष्यवाणी ऐकून खूपच खुश झाला आणि ज्योतिष्यांना धन्यवाद म्हणू लागला. ज्योतिषाची ही भविष्यवाणी ऐकून ड्रामाक्वीन राखी सावंतलासुद्धा मोठा धक्का बसला. ती ही भविष्यवाणी ऐकताना तोंड मोठे करून बसली होती.
खरतर राखी हा शो जिंकण्यासाठी काहीही करू शकते यात काही नवीन नाही. याआधी देखील राखीने शोमध्ये चार चाँद लावले होते आणि यावेळीही लावताना दिसतेय. पण तिला आतापर्यंत शो जिंकता आला नाही. त्यामुळे यंदा जिंकण्यासाठी ती पूर्ण प्रयत्न करतेय. म्हणूनच ज्योतिषाची भविष्यवाणी ऐकून राखीला धक्का बसला आहे. कारण भविष्यवाणीनंतर आता करण कुंद्रा विजयाचा मोठा दावेदार मानला जात आहे. करण कुंद्रा सध्या पुन्हा एकदा गेम ट्रॅकवर परतला आहे. तर तेजस्वी आणि करणमधील रोमांसमध्ये शमिताची एंट्री झाली आहे. त्यामुळे सध्या शोमध्ये शमिता, करण आणि तेजस्वी असा लव्हट्रँगल दिसून येत आहे.