Take a fresh look at your lifestyle.

‘कारभारी आणि कारभारणीचा चाहत्यांना निरोप’; मालिका संपल्यानंतर शेअर केल्या खास पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या झी मराठी या प्रेक्षकांच्या लाडक्या वाहिनीने जाणून नव्या मालिकांचे सत्र सुरु केले आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी जीव लावलेल्या त्यांच्या आवडत्या मालिका लवकरच एका मागोमाग एक अश्या सलग निरोप घेऊ लागल्या आहेत. त्यामुळे एकीकडे नव्या मालिकांचा उत्साह असला तरीही दुसरीकडे प्रेक्षकांमध्ये जुन्या मालिकांना निरोप देताना उर भरून येत आहे. या दरम्यान राजकारणावर आधारित असलेली ‘कारभारी लयभारी’ हि मालिका देखील प्रेक्षकांसाठी अत्यंत खास होती. या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात एक घर केलं आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र ‘कारभारी लयभारी’ मालिका संपल्यानंतर मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे या कलाकारांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikkhhil Chavaan (@nikkhhil_29)

मालिकेतील मुख्य भूमिकेत झळकलेल्या अभिनेता निखिल चव्हाण याने लिहिलं कि, ‘२ नोव्हेंबर २०२० संध्या ७.३० वाजता आम्ही दोघं तुमच्या भेटीला आलो होतो आणि २१ ऑगस्ट २०२१ ला ७.३० वाजता तुमचा निरोप घेतोय. मालिकेच्या ह्या प्रवासात बरीच नाती जोडली गेली आता ती आयुष्यभर सोबत असणार आहेत. झी मराठीने ह्या आधी फौजी अशी ओळख मला दिली होती आणि आता कारभारी अशी ओळख मिळाली आहे. त्याबद्दल झी मराठीचा खूप आभारी आहे तसेच वाघोबा प्रॉडक्शन्स आणि तेजपाल वाघ चा हि शतशः आभारी आहे. विरु आणि पियु ला महाराष्ट्र च्या प्रेक्षकांचे खूप खूप आभार. तुमचं प्रेम असेच राहुदेत लवकरच तुमच्या भेटीला येऊ बोललो तर बोललो!! एक सुंदर रिल शेअर करत निखिलनं या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anushka Sarkate (@anushkasarkte07)

तर मालिकेतील मुख्य पात्र साकारणारी अभिनेत्री अनुष्का सरकटे हिनेसुद्धा काही आठवणी शेअर केल्या आहेत. तिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. यात नादखुळा गाणे बॅकग्राऊंडला सुरु आहे आणि कारभारीण आपल्या कारभारींसोबत येताना तिच्या पायातील जोडवी निघते. ती जोडवी उचलून पुन्हा परिधान करण्यासाठी ती वाकू लागते तर कारभारी तिला थांबवून स्वतः तिच्या पायात जोडवी घालतात असा एक सुंदर क्षण या रिलमध्ये दिसतो आहे. हा व्हिडीओ शेअर करीत अनुष्का सरकटेने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, कारभारी लय भारी स्पेशल “कारभारी आणि कारभारणी सोबत शेवटची काही आठवण”.

 

Leave A Reply

Your email address will not be published.