Take a fresh look at your lifestyle.

मुलगा हवा की मुलगी ?? ; करिनाने दिलं ‘हे’ उत्तर

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर आणि सैफ अली खान दुसर्यांना पालक होणार आहेत.काही दिवसांपूर्वी त्यांनी या गोष्टीची घोषणा केली होती. त्यामुळे सध्या करीना तिच्या गरोदरपणातील काळ एन्जॉय करत आहे. विशेष म्हणजे या काळातही ती तिच्या फॅशनसेन्सकडे लक्ष देताना दिसून येते. त्यामुळे अनेकदा तिची चर्चा होते. सध्या सोशल मीडियावर करीनाची एक मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीत, मला मुलगी हवी आहे, असं करीना म्हणताना दिसत आहे.

सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असलेली करीनाची ही मुलाखत जुनी असून २०१६ मध्ये तिने ही दिली होती. तैमुरच्या वेळी गरोदर असताना करीनाने या मुलाखतीत मला मुलगी हवी असं म्हटलं होतं.

तुला मुलगा हवा की मुलगी? असा प्रश्न करीनाला विचारण्यात आला होता. त्यावर मुलगा असो किंवा मुलगी त्याने काय फरक पडणार आहे? मी मुलगी आहे त्यामुळे मला मुलगीच झालेली जास्त आवडेल. मी माझ्या आई-वडिलांसाठी एखाद्या मुलापेक्षा कमी नाही, असं करीना म्हणाली.

आई होताना दोन्ही सारखेच असतात असे ती सांगायची. तसेच आजही मुलगा मुलगी असे भेदभाव पाहायला मिळतात. जे मुलींना समान दर्जा देत नाहीत त्यांना हे माहित असावे की एक स्त्री देखील एख जीव आहे. जिच्यात एका जीवाला जीवन देण्याची क्षमता असते. 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.