Take a fresh look at your lifestyle.

करिनाने प्रेग्नन्सीची ‘गुडन्यूज’ सर्वात आधी सांगितली ‘या’ व्यक्तीला..

0

चंदेरी दुनिया । बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर खानच्या चर्चा सतत वाऱ्यासारख्या पसरत असतात. सध्या करिना तिच्या आगामी ‘गुडन्यूज’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटात ती अभिनेता अक्षय कुमारसोबत झळकणार आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत तिला तिच्या प्रेग्नन्सीबद्दल विचारण्यात आले. तू तुझ्या प्रेग्नन्सीची बातमी सर्वप्रथम कोणाला दिली होती. तेव्हा मी ही गोड बातमी सर्वप्रथम सैफ अली खानला दिली असल्याचे सांगितले.
‘मी प्रेग्नंट असल्याचं समजल्यानंतर प्रथम ही माहिती मी सैफलाच सांगितली होती. त्यानंतर कुटुंबियांना सांगितली. शिवाय तैमूरचे नाव देखील आम्ही आधीच ठरवलं असल्याचं सांगितलं.’ ‘गुडन्यूज’ चित्रपटाचं प्रमोशन सध्या जोरदार सुरू आहे. २७ डिसेंबर रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.

याच दरम्यान तिला तिच्या प्रेग्नन्सीच्या काळातील काही आठवणी विचारल्या. ‘गुडन्यूज’ चित्रपट ती एका प्रेग्नेंट महिलेच्या भूमिकेत झळकत आहे. २०१६ साली सैफ अली खान आणि करिना कपूर खान विवाह बंधनात अडकले. या दोघांमध्ये तब्बल १० वर्षांचं अंतर आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: