Take a fresh look at your lifestyle.

अक्षयचा पृथ्वीराज वादात अडकणार..?; करणी सेनेचा प्रदर्शनाविषयी कडक इशारा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याचा ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. अवघ्या दोन आठवड्यांचा प्रश्न असतानाच करणी सेनेनं मात्र गंभीर भूमिका घेत वादाला तोंड फोडले आहे. याच कारण ठरलाय ते या चित्रपटाचं नाव. होय. या चित्रपटाचे शीर्षक ‘पृथ्वीराज’ असे आहे मात्र करणी सेनेने ‘सम्राट पृथ्वीराज चौहान’ असे शीर्षक ठेवण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच करणी सेनेला हा चित्रपट दाखवण्यात आला होता. दरम्यान या चित्रपटातील सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेबाबत काहीही आक्षेप नाही असे त्यांनी सांगितले होते. मात्र आता नावावर आक्षेप घेत त्यांनी शंख फुकला आहे.

करणी सेनेने ‘पृथ्वीराज’ चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना या चित्रपटाचे नाव पृथ्वीराज नाही तर सम्राट पृथ्वीराज चौहान करा असा नाव बदल करण्याची मागणी केली आहे. अन्यथा चित्रपट प्रदर्शित होऊन देणार नाही असा इशाराही दिला आहे. करणी सेनेचे सुरजीत सिंह राठोड यांनी ‘ई टाइम्स’शी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान या मुलाखतीत ते म्हणाले, ““यश राज फिल्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षये विधानी यांची आम्ही भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला चित्रपटाच्या नावात बदल करण्याचं आश्वासन दिलंय. त्यांना आमची मागणी योग्य वाटतेय. जर त्यांनी चित्रपटाच्या नावात बदल केला नाही तर राजस्थानमध्ये आम्ही हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. याबाबत आम्ही राजस्थानमधील वितरकांना आधीच कल्पना दिली आहे.”

‘पृथ्वीराज’ या चित्रपटात अक्षय कुमार सोबत संजय दत्त, सोनू सूद आणि मनुषी छिल्लर या कलाकारांच्याही अन्य मुख्य भूमिका आहे. ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकणारी मनुषी आता बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करतेय. तिच्यासाठी हा चित्रपट बॉलिवूड इंडस्ट्रीचा मुख्य द्वार ठरला आहे. या चित्रपटात ती संयोगिताची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अक्षय आणि मनुषी यांची केमिस्ट्री अत्यंत लक्षवेधी आहे. अलीकडेच रिलीज झालेल्या हद कर दे या गाण्यात अक्षय आणि मानुषी म्हणजेच सम्राट पृथ्वीराज चौहान आणि संयोगिता यांची केमिस्ट्री दाखवली आहे. हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. हा चित्रपट ३ जून २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. पण आता करणी सेना काय भूमिका घेते यावर चित्रपटाचे प्रदर्शन अवलंबून आहे.