Take a fresh look at your lifestyle.

करण जोहरच्या ‘दोस्ताना २’ मधून कार्तिक आर्यनची हकालपट्टी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन नेहमीच त्याच्या लूक आणि स्टाइलमुळे चर्चेत राहिला आहे. त्याने अनेक चित्रपटांतून आपले नाव केले. इतर प्रोडक्शनसोबत किमान एकदा तरी कार्तिकला करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये काम करण्याचे होते. दरम्यान त्याला हि संधी मिळालीसुद्धा. करण जोहरने आगामी चित्रपट ‘दोस्ताना २’साठी कार्तिक आर्यनला साइन केले. मात्र या संधीचे सोने होण्यापूर्वीच कार्तिकचे हे स्वप्न करण जोहर आणि धर्मा प्रोडक्शन्सने तोडले आहे. करण जोहरने कार्तिकला या चित्रपटातून काढून टाकल्याचे हे वृत्त आहे.

एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, करण जोहरने कार्तिक आर्यनला ‘दोस्ताना २’ मधून काढून टाकले आहे. इतकेच नव्हे तर भविष्यात कार्तिकसोबत कधीही काम न करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. कार्तिक आर्यनच्या अनप्रोफेशनल वागण्यामुळे आणि सिनेमाच्या स्क्रिप्टला घेऊन त्या दोघांमध्ये असलेल्या मतभेदामुळे कार्तिकची या चित्रपटातून हकालपट्टी करण्यात आली आहे, असे समोर येत आहे.

मिळालेल्या रिपोर्टनुसार साधारण “दीड वर्षानंतर कार्तिकला ‘दोस्ताना २’ च्या स्क्रिप्टमध्ये काहीतरी कमी असल्याचे जाणवले. यामुळे स्क्रिप्टमध्ये त्याला बदल हवा होता. या कारणास्तव धर्मा प्रॉडक्शनने त्याच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘दोस्ताना २’ या चित्रपटाचे फक्त २० दिवसांचे शूटिंग पार पडले होते. गेल्यावर्षी कोरोना प्रोटोकॉलमुले शूटिंग झाले नाही. मात्र यावर्षी शासनाने परवानगी दिली असता चित्रपटाचे शूटिंग सुरु करण्यात आले होते.

अभिनेता कार्तिक आर्यनने २०११ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘प्यार का पंचनामा’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर आकाशवाणी, कांची द अनब्रेकेबल, प्यार का पंचनामा २, गेस्ट इन लंडन, पती पत्नी और वोह यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केले. मात्र सोनू के टीटू की स्वीटी या चित्रपटाने तो ख-या अर्थाने प्रेक्षकांसमोर आला. नुकतेच त्याचा आगामी चित्रपट भुलभुलैय्या २ चे शूटिंग पूर्ण झाले आहे. तर लवकरच त्याचा धमाका हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान तो दोस्ताना २ च्या शूटिंगमध्ये व्यग्र होता. त्यामुळे या चित्रपटाची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता होती. पण करण जोहरने आता कार्तिकलाच चित्रपटातून बाहेर काढले आहे. त्यामुळे आता दोस्ताना २ मध्ये कार्तिकची जागा कोण घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.