Take a fresh look at your lifestyle.

कार्तिक आर्यनचा कॉमेडी भयपट ‘भुलभुलैय्या 2’ या दिवशी होणार प्रदर्शित; जाणून घ्या

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनामुळे चित्रपटसृष्टी बराच काळ शांत होती. मात्र निर्बंधांच्या शिथिलतेनंतर आता चित्रपट गुहांमध्ये पुन्हा तोच जल्लोष पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठी इंडस्ट्रीने तर सलग महिनोन्महिने थिएटर गाजवायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे बॉलिवूड इंडस्ट्रीसुद्धा काही कमी नाही. लवकरच बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित बॉलिवूड चित्रपट भूलभुलैया २ चाहत्यांच्या मनोरंजनासाठी प्रदर्शित होणार आहे. येत्या २५ मे २०२२ रोजी हा कॉमेडी भयपट सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी दिसणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून असा थरार निर्माण करणारा हॉरर कॉमेडी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील चांगलेच उत्सुक होते. मात्र येत्या मे महिन्यात त्यांची हि उत्सुकता आणि इच्छा पूर्ण होऊ घातली आहे. आता भुलभुलैय्या २ च्या निर्मात्यांनी नव्या रिलीज तारखेला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी हा चिरंतपत २५ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र याच दिवशी बाहुबली दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा चित्रपट ‘RRR’ रिलीज होणार होता. यामुळे दोन्ही चित्रपटांमध्ये टक्कर झाली असती. यानंतर आता निर्मात्यांच्या घोषणेनंतर ‘भूलभुलैया २’ आणि ‘RRR’मध्ये टक्कर होणार नाही हे निश्चित आहे.

 

टी-सीरीजच्या अधिकृत इंस्टाग्रामवर पोस्टच्या माध्यमातून ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट २० मे २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याआधी २००७ सली प्रदर्शित झालेला भुलभुलैय्या या हॉरर भयपटाचा हा चित्रपट सिक्वल आहे. यात अक्षय कुमार आणि विद्या बालन मुख्य भूमिकेत होते. यानंतर अनीस बज्मी दिग्दर्शित ‘भूल भुलैया २’ मध्ये कार्तिक आर्यन, किनारा अडवाणीसह तब्बू आणि राजपाल यादव यांच्या मुख्य भूमिका आहेत.