Take a fresh look at your lifestyle.

कार्तिक आर्यन बनला सांताक्‍लॉज…

0

चंदेरी दुनिया । जगभर आज नाताळचा सण साजरा होतो आहे. बालगोपाळांना खेळणी आणि खाऊ वाटणारा सांताक्‍लॉज सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतो, असे म्हटले जाते. यासाठी सांताक्‍लॉजच्या वेशभुषेमध्ये अनेकजण आपापल्या जवळच्या व्यक्‍तींना काही ना काही गिफ्ट देत असतात.

कार्तिक आर्यननेही सांताक्‍लॉजच्या वेशभुषेमध्ये आपल्या मित्रमंडळींना गिफ्ट वाटली आहेत. त्याचे मित्र रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणनेही त्याच्याकडे काही गिफ्ट मागितली आहेत. दीपिकाचा छपाक 10 जानेवारीला रिलीज होतो आहे. ती या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. जेंव्हा सांताक्‍लॉज बनलेल्या कार्तिक आर्यनने इन्स्टाग्रामवर कोणाला काय गिफ्ट हवे? असे विचारले तेंव्हा दीपिकाने या व्हिडीओच्या कॉमेंटमध्ये आपल्या सिनेमाशी संबंधितच गिफ्ट मागितले आहे. तू जाऊन छपाक बघ.

अशी अपेक्षाच दीपिकाने कार्तिकजवळ बोलून दाखवली आहे. कार्तिकने दीपिकाच्या या अपेक्षेवर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पण दीपिकाच्या या अपेक्षेकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले आहे. सांताक्‍लॉज बनलेल्या कार्तिककडे इतरही काही जणांनी आपल्या अपेक्षा व्यक्‍त केल्या आहेत. कार्तिकचा पती, पत्नी और वो रिलीज झाला आहे. सध्या तो दोस्ताना 2च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय तो आज कलमध्येही दिसणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: