Take a fresh look at your lifestyle.

आता बायॉपिकमध्ये झळकणार कार्तिक आर्यन….

चंदेरी दुनिया । ‘सोनू के टीटू की स्वीटी’च्या प्रदर्शनानंतर अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. तसेच बॉक्‍स ऑफिस नंबर्समध्येही तो किंग ठरत आहे. यावर्षी त्याचे ‘लुका छिपी’ आणि ‘पति पत्नी और वो’ हे दोन चित्रपट रिलीज झाले होते आणि ह दोन्ही चित्रपट हिट ठरले होते.

तसेच आगामी वर्षातही त्याच्याकडे अनेक इंस्ट्रेस्टिंग प्रॉजेक्‍ट्‌स आहेत. यात ‘लव आज कल 2′, ‘दोस्ताना’ आणि ‘भूल भुलैया2′ यासारखे चित्रपट आहेत. याशिवाय आता कार्तिक आर्यन एका बायॉपिकमध्ये झळकणार आहे. हा चित्रपट दिवंगत पंजाबी गायक अमर सिंह चमकीला यांच्या जीवनावर आधारित आहे.

या चित्रपटाला इम्तिाज अली प्रड्यूस करणार असून याचे दिग्दर्शनी इम्तियाजचा भाउ साजिद अली करणार आहेत. ज्यांनी ‘लैला मजनू’ चिख्पटाचे डायरेक्‍शन केले होते. जर असे झाल्यास इम्तियाज अली आणि कार्तिक आर्यन दुस-यांदा एकत्रित काम करणार आहेत. ‘लव आज कल 2’चे डायरेक्‍शनही इम्तियाजने केले होते. आता कार्तिक एक रोमांटिक कॉमिडी असलेल्या चित्रपटात झळकणार असल्याने त्याची भूमिका खूपच वेगळी असणार आहे.

Comments are closed.

%d bloggers like this: