Take a fresh look at your lifestyle.

कार्तिक आर्यनचा धमाका; पहा नेटफ्लिक्सवर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन म्हणजे तरुणींच्या गळ्यातला ताईतच म्हणावे लागेल. चॉकलेट बॉय आणि हॅण्डसम हंक कार्तिक आता लवकरच नेटफ्लिक्सवर झळकणार आहे. त्याने आपल्या ‘धमाका’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत कार्तिकने चाहत्यांना हि आनंदाची बातमी दिली आहे. या पोस्टरमध्ये कार्तिक आर्यन हा सूटमध्ये लांब केस आणि वाढलेल्या दाढी सोबतच डोळ्यांवर स्पेक्स अश्या लूकमध्ये खूपच वेगळा पण देखणा दिसत आहे.

कार्तिक आर्यनच्या या चित्रपटासाठी नेटफ्लिक्सने १३५ कोटी रुपये दिल्याची चर्चा आहे. त्यानुसार ओटीटीवरील हा सर्वात महागडा चित्रपट म्हणून याचे वर्णन केले जात आहे. या बातमीनंतर नेटफ्लिक्सने असे म्हटले आहे की, ते केवळ चुकीचे आहे, ही आकडेवारी अजिबात खरी नाही. याद्वारे हे स्पष्ट झाले आहे की, धमाकाच्या अधिकाराबाबत ज्या गोष्टी समोर आल्या आहेत, त्या केवळ अफवा होत्या किंवा आपण असे म्हणू शकता की, हा एक पब्लिसिटी स्टंट देखील असावा. चित्रपटाचे एकूण ओटीटी हक्क, त्यातील निम्मेही अद्याप विकले गेलेले नाहीत.

अशी माहिती आहे कि, हा चित्रपट साउथ कोरियन ‘द टेरर लाइव’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट थ्रिलर असून यात कार्तिक आर्यनसह मराठी अभिनेत्री अमृता सुभाष या टीझरमध्ये दिसतेय. मात्र यांच्या व्यतिरिक्त आणखी कोण असणार? आणि कोणत्या भूमिका साकारणार? हे अद्याप सामोरी आलेले नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम माधवानी यांनी केले आहे. तर राम माधवानी यांच्यासह अमिता माधवानी आणि रॉनी स्क्रूवाला यांची निर्मिती आहे. लॉकडाऊनपूर्वी कार्तिक आर्यन हा ‘भुलभुलैया-२′ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. याशिवाय कार्तिकने जान्हवी कपूरसोबच्या ‘दोस्ताना-२’ या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.