Take a fresh look at your lifestyle.

डान्समध्ये कार्तिकही धरू शकला नाही ह्रितिकचा हात !

0

कार्तिक आर्यनने त्याच्या ‘पती पत्नी और वो’ चित्रपटातील धीमे धीमे गाण्याच्या क्लिष्ट हूक स्टेपचे ‘धीमे धीमे चॅलेंज’ बऱ्याच जणांना दिले आणि ते सोशल मीडिया वर व्हायरल झाले.

रविवारी झालेल्या स्टार स्क्रिन अवॉर्ड मध्ये कार्तिकने हे चॅलेंज ‘सुपर डान्सर’ ह्रितिकला दिले. ह्रितिकने क्षणाचाही विलंब न लावता कार्तिकला फॉलो करत, ती स्टेप सराईतपणे करून दाखवली. दोघांना एकत्र बघताना ह्रितिकचा डान्स मध्ये कोणीही हात धरू शकत नाही असच वाटतं.

यापूर्वी कार्तिकने हे चॅलेंज रणवीर, दीपिका सोबत बऱ्याच जणांना दिले होते. हइ डान्स दिसते तितकी सोप्पी नाही असं म्हणत दीपिकाने स्वतः कार्तिकला एअरपोर्टवर गाठून हि स्टेप शिकून घेतली होती. तो व्हिडिओही खूप व्हायरल झाला होता. आज पुन्हा एकदा ह्रितिक आणि स्टार स्क्रिन अवॉर्ड्सच्या निमित्ताने ‘धीमे धीमे चॅलेंज’ चर्चेत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: