Take a fresh look at your lifestyle.

दिसायला नको तेही लागलं दिसू, व्हिडीओ पाहून लोक लागली हसू; ‘काटा लगा’ गर्ल शेफाली झाली उप्स मूमेंटची शिकार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘काटा लगा’ या गाण्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी शेफाली जरीवाला सध्या अभिनय क्षेत्रात फारशी कार्यरत नाही. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच आपल्या चाहत्यांशी संपर्क साधत असते. आजकाल ती सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह आहे. अनेक कलाकार व्हॅकेशनसाठी मालदीवला गेले आहेत. शेफाली आणि तिचा नवरा पराग हे दोघेही या यादीत आहेत. नुकताच शेफालीने क्रूझवर टायटॅनिक पोझ देतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती उप्स मुमेंटची शिकार झाल्याचे दिसत आहे.

अनेकदा अभिनेत्री लाज येईल अश्या प्रसंगांना बळी पडतात. त्यात सोशल मीडियावर पोस्ट करायच्या घाईत कळत- नकळत असे प्रसंग व्हायरल होतात. शेफाली जरीवाला पतीसोबत मालदीवमध्ये एन्जॉय करतानाचा हा व्हिडीओ आहे. तिचा हा उप्स व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी विविध कमेंट करीत तिची खिल्ली उडवल्याचे दिसत आहे. शेफाली एका क्रूझवर पतीसोबत टायटॅनिक पोज देत होती.

यावेळी, तिचा पती पराग तिच्याबरोबर होता. शेफालीने यावेळी फ्रिल स्टाईल ड्रेस परिधान केला होता. इतक्यात जोरदार वारा आला आणि ड्रेसही उडायला लागला. वाऱ्याच्या वेगामुळेच तिच्यावर उप्स मूमेंटची वेळ आली. शेफालीने यावेळी स्वतःला पटकन सावरल्याचेही दिसत आहे.

अनेकदा शेफाली तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत असते. अनेकदा शेफाली फॅशन एक्सपिरिमेंट करीत असते. पण तीच्या फॅशनमुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा फारसा फरक पडत नाही. त्यामुळे तिला जसे वाटेल तशी ती फॅशन बिंधास्तपणाने करते. मात्र अनेकदा तिचा बोल्ड अंदाज आणि युनिक फॅशन चाहत्यांच्या पसंतीस सुद्धा पडते.