Take a fresh look at your lifestyle.

कतरिनामुळे माझ्या करिअरवर परिणाम झाला ; ‘या’ बड्या अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री झरीन खानने अभिनेता सलमान खानच्या चित्रपटातुन बॉलीवूड मध्ये दमदार पाऊल टाकलं होतं. परंतु इतक्या वर्ष काम करून देखील झरीन खान चे मोठं होऊ शकलं नाही. त्यामुळेच झरीन खान चित्रपटसृष्टीतल्या एका गोष्टीमुळे खूप चिडते कारण झरीन खानची तुलना नेहमीच अभिनेत्री कतरिना कैफसोबत केली जाते.कतरीनासारखं दिसण्यामुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. अनेक दिग्दर्शकांनी तिला डुप्लीकेट (Duplicate) असल्याचं कारण देवून काम नाकारलं असल्याची खंत झरीन खानने व्यक्त केली आहे.

नुकताच झरीनने ‘नवभारत टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला तिची तुलान बऱ्याच वेळा अभिनेत्री कतरिना कैफशी करण्यात येते असे विचारले गेले.  त्यावर तिने उत्तर देत कतरिनामुळे माझ्या करिअरवर परिणाम झाला असे म्हटले. ‘प्रत्येक व्यक्ती हा इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण करण्यासाठी येतो. मी बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी ओळख निर्माण करण्यासाठी गेली ११ वर्षे प्रचंड मेहनत घेतली. पण आजपर्यंत लोकं मला मी कतरिनासारखी दिसते असं म्हणतात. मी तिच्यासारखी दिसत असल्यामुळे कोणताही चित्रपट निर्माता माझ्यासोबत काम करण्यास तयार नाही. कतरिनामुळे माझ्या करिअरवर परिणाम झाला’ असे झरीन म्हणाली.

पुढे ती म्हणाली, ‘बऱ्याच वेळा लोकं मला मी अभिनेत्री पूजा भट्ट सारखी दिसते असे म्हणतात. तर कधी मी प्रीती झिंटा आणि सनी लिओनीसारखी दिसत असल्याचे म्हटले जाते. पण लोकं मला मी अभिनेत्री झरीन खान आहे असं का म्हणत नाहीत?’

झरीन खान गेल्या ११ वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. तिने ‘हाऊसफूल २’, ‘हेट स्टोरी ३’, ‘अकसर २’, ‘रेडी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता लवकरच तिचा आणखी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘हम भी अकेले तुम भी अकेले’ असे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.