Take a fresh look at your lifestyle.

मुंबई मनपा निवडणुकीसाठी रस्त्यावर TRP’चा तमाशा; केदार शिंदेंचे ट्विट जोरदार चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या २ वर्षांपासून कोरोना महामारीने लोकांना सळो कि पालो करून ठेवलं आहे. दरम्यान अनेक निर्बंध आल्यामुळे विविध स्तरांवरील व्यावसायिक, कलाकार आणि मोठमोठ्या इंडस्ट्रीजचे नुकसान झाले आहे. यात कलाविश्वाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले होते. कारण चित्रपटगृहे, नाटके आणि अगदी मालिकांचे शूटिंग देखील बंद होते. परिणामी अनेकांना हालअपेष्टा सहन करावी लागली. यानंतर आता निर्बंध शिथिल झाल्यानंतर सर्वांच्या जिवंत जीव आला. यातच आता खेडं शिंदेनी सिनेमागृहात आसनक्षमतेबाबत एक ट्विट केले आहे जे गेल्या २४ तासात तुफान व्हायरल झाले असून चांगलेच चर्चेत आले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. या दरम्यान हॉटेल्स, मॉल्स वा राजकीय कार्यक्रमांमध्ये माणसांची गर्दी ही ५० टक्के असणे अपेक्षित आहे. मात्र तसे पाहिले तर कुठेही जा ५० टक्क्यांपेक्षा जास्त गर्दी दिसत आहे. यामुळे आता कलाकारही नाट्यगृह आणि सिनेमागृहांवरील ५० टक्के क्षमतेचे बंधन काढून टाकावे, अशी मागणी करत आहेत. दरम्यान मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करताना हलकेच सरकारला चिमटा काढला आहे. त्यामुळे त्यांचे ट्वीट सोशल मिडियावर चांगलेच चर्चेत आले आहे.

या ट्वीट्मध्ये मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी लिहिले कि, ‘आमच्या नाटक सिनेमाला ५० टक्के बंधनं. रोज राजकिय नाटक रस्त्यावर सुरू आहेत त्यांना काहीच नियम नाहीत? फक्त मुंबई मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रस्त्यावर उतरणे आणि तमाशा करून TRP मधे राहणे एवढच काम करतायत, असा टोला केदार शिंदे यांनी लगावला आहे. केदार शिंदे असेही आपल्या परखड मुद्देसूद मांडणीसाठी प्रसिद्द आहेत. त्यामुळे केदार शिंदेनी ट्विटच्या माध्यमातून सरकारला काढलेला चिमटा बेरोबर लागला असेल यात काही वाद नाही.