Take a fresh look at your lifestyle.

सणांचा बागुलबुवा.. सामान्यांच्या जीवनाचा दहीकाला; केदार शिंदेंचे सणसणीत ट्विट व्हायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गतवर्षपासून कोरोना नामक विषाणूचा वाढत कहर पाहता शासनाने काही कडक निर्बंध लागू केले आहेत. तरीही आता कोरोनाची दुसरी लाट ओसरतेवेळी ह्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात अली असून जनसामान्यांचे आयुष्य पुन्हा एकदा एका सरळ रेषेत सुरु झाले होते. होते म्हणण्याचे कारण असे कि श्रावण महिन्यात अनेको सण असतात हे आपण सारेच जाणतो. यात सगळ्यात विशेष आकर्षण असणारा सण म्हणजे गोपाळकाला अर्थात दहीहंडी. मात्र कोरोनामुळे राज्य सरकारने दहीहंडी साजरी करण्यास मनाई केली आहे.मात्र भाजप आणि मनसेचे एक आक्रमक पवित्र घेत निर्बंध झुगारून दहीहंडी साजरी केली आहे. याच पार्शवभूमीवर दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता केदार शिंदे यांनी एक सणसणीत ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी या पक्षांवर चांगलाच निशाणा साधला आहे.

केदार शिंदे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. त्यामुळे योग्यवेळी योग्य मुद्द्यावर बोलणे ते पसंत करतात. दरम्यान काल रात्री केदार शिंदे यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, ‘राजकीय नेते एकमेकांच्या हंड्या फोडण्याच्या कार्यक्रमात मग्न आहेत. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी आहे. गेल्या दोन वर्षांत सामान्यांच्या जीवनाचा दहीकाला झालाय, याकडे कुणाचही लक्ष नाही’. केदार शिंदेंच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजरने लिहिले कि, सरकार शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे जरी असले तरी संपूर्ण आरोग्य यंत्रणा अहोरात्र आणि अथक परिश्रम घेतेय‌. पण काही पक्ष सणांचा बागुलबुवा करत फक्त विरोधापोटी अक्षरशः अडाणीपणा दाखवत आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नांचे मातेरं करण्यात धन्यता मानतात.

तर अन्य एका युजरने लिहिले कि, सामान्य लोकच ह्याला जबाबदार. स्वतःच डोकं न वापरल्याने त्याचं मडकं केले. पक्षांना फिरतं ठेवायचं. नाहीतर मतदारांना गृहीत धरतात. कठीण काळातच खरा कोण ते कळतं. 2024 ला तरी डोक वापरतील ही आशा?

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या भले कमी झाली असेल मात्र संकट संपलेले नाही. त्यामुळे अशात सणवार, उत्सव साधेपणाने साजरे करून जनतेचे प्राण वाचविण्याला प्राधान्य द्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडीला परवानगी नाकारताना केले होते. मात्र भाजप व मनसे या दोन्ही पक्षांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला आणि ठाणे – मुंबईत दहीहंडी धडाक्यात साजरी होणार असे छाती ठोकून सांगितले. यानंतर मनसेने ठाणे, मुंबईत रात्री पहाटेच्या सुमारास मानवी मनोरे उभारत दहीहंडी फोडली. याचा निश्चितच परिणाम लवकरच वाढत्या रुग्णसंख्येच्या रूपात दिसेल असे अनेको नेटकऱ्यांनी ट्विट करीत म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.