Take a fresh look at your lifestyle.

… तोवर माणूस म्हणवून घ्यायची लायकी नाही; झुंड’च्या टीकाकारांना केदार शिंदेंची चपराक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन स्टार चित्रपट झुंड ४ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची एकीकडे बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई चालू असताना दुसरीकडे प्रेक्षक आणि समीक्षकांनी चित्रपट डोक्यावर उचलून घेतला आहे. अशातच अनेकांनी झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी मुख्य नायक असण्यावरून टीका डागल्या आहेत. आता इतकं कौतुक झाल्यावर टीकांसाठी साहजिकच मंजुळे सज्ज असले तरीही इंडस्ट्रीतील इतर कलाकारांना हे मान्य नाही. त्यामुळे मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून अशा टीकाकारांना शाब्दिक चपराक लगावली आहे.

‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ यांसारख्या दमदार मराठी चित्रपटांनंतर मंजुळेंनी ‘झुंड’च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्यांच्या या पहिल्याच हिंदी कलाकृतीला विशेष प्रेम मिळत आहे. आमिर खान, धनुष यासारख्या बड्या कलाकारांनी झुंडच्या संपूर्ण टीमचे तोंडभर कौतुक केले आहे. तर दुसऱ्या गटाकडून नागराज यांच्यासह चित्रपटावर टीका करण्यास सुरुवात झाली आहे. अशा टीकाकारांना प्रत्युत्तर देताना दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ट्विट करीत लिहिले कि, ‘जात.. जात नाही तोवर माणूस म्हणवून घ्यायची आपली लायकी नाही.’ यासोबत #झुंडसिनेमाम्हणूनपाहा असा हॅशटॅग वापरत टीकाकारांची अकड काढली आहे.

प्रख्यात लेखिका आणि ब्लॉगर म्हणून ओळख असलेल्या शेफाली वैद्य यांनी सोशल मीडिया फेसबुकच्या माध्यमातून नागराज मंजुळे आणि त्यांचा चित्रपट झुंडवर टीका करताना पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले कि, “इतका राग होता ‘उच्चवर्णिय प्रस्थापितांवर’ तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला?” त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत आपली विविध मतं मांडली. अनेकांनी शेफाली यांच्या विचारांचा निषेध केला असता त्या काही आपल्या भूमिकेवरून मागे फिरल्या नाहीत. त्यात आता केदार शिंदेंचं हे ट्विट पाहून कुणीही समजून जाईल कि हि चपराक म्हणा वा टोमणा नेमका होता कुणाला.