Take a fresh look at your lifestyle.

राज ठाकरेंना अव्वल कलाकार म्हणणारी केदार शिंदेंची पोस्ट व्हायरल; पहा फॊटो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांनी लोककलेचा वारसा जपला आहे यात कोणतीच शंका नाही. आजही आणि अनंत काळापर्यंत हे नाव तितकेच गाजेल कारण लोककला जिवंत ठेवण्यात त्यांचा मोठा हात आहे. महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे उभ्या पिढीने अनुभवण्यासाठी त्यांचा नातू आणि मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा दिग्दर्शक केदार शिंदे त्यांचा वारसा चालवीत आहे. अशातच केदार शिंदे यांनी शाहीर यांच्या जीवनाचे भाष्य करणारा चित्रपट प्रदर्शित करण्याचे योजिले आहे. अलीकडेच याचे पोस्टर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते रिलीज करण्यात आले. यानंतर आता केदार शिंदेंची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक, अभिनेता आणि लेखक केदार शिंदे शाहीर साबळे यांचा नातू असून त्यांचा वारसा चालवताना दिसत आहेत. दरम्यान त्यांच्या जीवनपटाचे पोस्टर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या शुभहस्ते व्हावे यासाठी केदार यांनी मनसेची सभा हेच स्थळ निवडले. अखेर हा सोहळा संपन्न झाला आणि याच सोहळ्याचा एक फोटो केदार शिंदे यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. राज ठाकरे हे स्वतः एक उत्तम व्यंगचित्रकार आहेत. याशिवाय फिल्ममेकरही आहेत. त्यामुळे कलेची जाण असलेले राज ठाकरे पोस्टरकडे न्याहाळून पाहत असल्याचा हा फोटो आहे. या फोटोसह केदार यांनी कॅप्शन दिले आहे कि, आपल्या कलाकृतीकडे पाहणारा एक अव्वल कलाकार… मनस्वी आनंद. या पोस्टवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. पोस्टर रिलीजनंतर आता प्रतीक्षा आहे ती चित्रपटाच्या प्रदर्शनाची.

‘महाराष्ट्र शाहीर’ असे शीर्षक असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण १ मे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथील सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी केदार शिंदे, अंकुश चौधरी उपस्थित होते. तसेच यावेळी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचा टिझरदेखील दाखवण्यात आला. यावेळी शाहीर साबळे यांच्या भूमिकेत अंकुश चौधरी असल्याचे जाहीर होताच चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे अशी घोषणा देखील करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला अजय अतुल यांचे संगीत असणार आहे