Take a fresh look at your lifestyle.

केजो’ची मोठी घोषणा! ‘Coffee With Karan’ पुन्हा येणार नाही..; ट्विट चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील अत्यंत नामांकित निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. कधी वादग्रस्त वक्तव्य तर नेपोटीझममुळे केजो सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतो. पण एव्ह्ढ्यातही त्याचा चॅट शो चांगलाच लोकप्रिय ठरला होता. या शो चे नाव ‘कॉफी विथ करण’ असे होते. या शोने एक दोन नव्हे तर तब्बल ६ सीजन गाजवले आहेत. या शोमध्ये विविध सेलेब्रिटी करणच्या प्रश्नांची उत्तर देण्यास बांधील असायचे आणि यातच मजा होती. पण आता केजोने ट्विटरवर एक ट्विट शेअर करीत हा शो पुन्हा येणार नाही अशी घोषणा केली आहे. यामुळे सोशल मीडियावर नाराजीचे वातावरण पसरले आहे.

करण जोहर याने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून एक पोस्ट ट्विट करत याबद्दलची माहिती देणारी घोषणा केली आहे. यामध्ये त्याने लिहिले आहे कि, ‘हॅलो, गेल्या सहा सिझन्सपासून ‘कॉफी विथ करण’ हा शो माझ्या आणि तुमच्या आयुष्याचा भाग होता. या शोद्वारे मी लोकांवर प्रभाव टाकण्यात यशस्वी ठरलो आणि पॉप कल्चरच्या इतिहासातही आम्हाला आमची जागा मिळाली. तरीही अत्यंत जड अंतःकरणाने मी हे सांगू इच्छितो की कॉफी विथ करण पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही’. या ट्विटनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया देत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, १९ नोव्हेंबर २००४ रोजी केजोच्या ‘कॉफी विथ करण’ या शोचा पहिला एपिसोड प्रसारित झाला होता. या शोमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यांच्या खासगी आयुष्यातील अत्यंत महत्वाचे आणि म्हणायला प्रायव्हेट असे खुलासे करणने केले होते. करणचा हा चॅट शो चांगलाच लोकप्रिय आहे. कारण या शोमध्ये करण आणि सेलिब्रिटींमध्ये रंगलेल्या गप्पा पाहण्यात काही औरच मजा होती. याच शोमध्ये करणचा कंगना रनौतशी वाद झाला होता आणि यानंतर तिने करणवर नेपोटीझमचा आरोप लावलेला. हा वाद आजही कायम आहे. दरम्यान काही दिवसांपासून या शोचा आगामी सीजन येणार अशी चर्चा होती पण आता करणच्या ट्विटमुळे हि आशा मावळली आहे.