Take a fresh look at your lifestyle.

केजो’ची पार्टी ठरली कोविड स्प्रेडर; करीना कपूर, अमृता अरोरा, महिप कपूर आणि सीमा खानला कोरोनाची लागण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून शासनाकडून सतत कोरोनाच्या नियमावलीचे पालन करण्याबाबत वारंवार सांगितले जात असताना आता बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कोरोनाचे सावट पसल्याचे समोर आले आहे. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान, अभिनेत्री अमृता अरोरा, महिप कपूर आणि सीमा खान याना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. मुख्य म्हणजे याची सुरुवात करण जोहरच्या पार्टीतून झाल्याचे समोर आले आहे. यानंतर BMC’ने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान आज करीना आणि अमृताच्या इमारतीत BMC कडून कोविड टेस्टिंग कॅम्प लावण्यात येणार आहेत. यावेळी बीएमसीचे वैद्यकीय पथक दोन्ही इमारतीत आरटीपीसीआर चाचणी करणार आहेत. दरम्यान या बिल्डिंग कंपाऊंड आणि इतर ठिकाणीही सॅनिटायझेशन होणार आहे. शिवाय करण जोहरच्या घरीदेखील सॅनिटाइझ करण्यात येईल. याचे कारण म्हणजे पार्टी करणच्या घरी झाली होती आणि इथूनच कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. यामुळे सध्या करीना कोविड पॉझिटिव्ह आल्यामुळे होम आयसोलेशनमध्ये आहे. दरम्यान करीनासह अमृता, महीप आणि सीमा यांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे इतर सेलिब्रिटींना सावध करण्यात आले आहे. या पार्टीमध्ये एकाच गर्ल गँगमध्ये चौघी असल्याने सोबतच पार्टी वा गेट टुगेदर करताना त्या दिसतात.

वृत्तानुसार, सर्वात आधी सलमान खानची वहिनी अर्थात सीमा खानला कोरोनाची लागण झाली. ती गेल्या ८ डिसेंबर २०२१ रोजी करण जोहरच्या घरी गेट टु गेदरसाठी गेली होती. याच पार्टीत करीना कपूर खान, अमृता अरोरादेखील उपस्थित होत्या. ‘कभी खुशी कभी गम’ या सिनेमाला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ही पार्टी करण जोहरने आयोजित केली होती. यानंतर ११ डिसेंबर २०२१ रोजी सीमा खानचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर करीना आणि अमृता यांचीही कोरोना चाचणी झाल्यानंतर त्या दोघीही संक्रमित असल्याचे समोर आले. एवढेच नव्हे तर करीना आणि अमृता या रिया कपूरच्या घरीही एकत्र आल्या होत्या. याठिकाणी करिश्मा, मलाइका अरोरा, मसाबा गुप्तादेखील उपस्थित होत्या.