Take a fresh look at your lifestyle.

बिग बॉस शोच्या संकल्पनेवर केतकी चितळेची टीका; म्हणाली अशा नकारात्मक, अर्थहीन प्रयोगात..,

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलर्स वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे मराठी बिग बॉस. यंदा बिग बॉस मराठीचे चौथे पर्व असून याबाबत प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. बिग बॉस असा शो आहे ज्यामध्ये वर्षभरात गाजलेल्या आणि चर्चेत राहिलेल्या सेलिब्रिटींचा समावेश असतो. स्पर्धक म्हणून आलेले हे सेलिब्रिटी मूळ पातळीवर उतरून एकमेकांना ‘कांटे की टक्कर’ देताना दिसतात आणि हेच प्रेक्षकांना आवडत. या वर्षात अभिनेत्री केतकी चितळे अत्यंत चर्चेत राहिली. विविध वादग्रस्त विधाने आणि त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे तीच नाव वारंवार गाजताना दिसलं. त्यामुळे यंदा बीबी मराठीत केतकी येणार असा लोकांनी तर्क लावला आहे. यावर केतकीने दिली आहे.

अभिनेत्री केतकी चितळेने अगदीच स्पष्टपणे आपण बिग बॉस मराठीच्या घरात जाणार नसल्याचं सांगितलं आहे. इतकंच काय तर नेहमीप्रमाणे वाढीव बोलून तिने चर्चांना पूर्ण विराम नाही तर चर्चांना नवा विषय दिला आहे. केतकीने बिग बॉस या शोच्या संकल्पनेवरच टीका केली आहे. शिवाय ती म्हणाली की, ‘या शोमध्ये सहभागी होणं हे माझ्या दृष्टीने कमी दर्जाचं आहे. दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलंय आणि त्यामुळे पुन्हा मला उत्तर द्यावं लागतंय. बिग बॉससारख्या नकारात्मकता पसरवणाऱ्या टीव्ही शोजना मी प्रोत्साहन देत नाही. त्यामुळे अशा अर्थहीन प्रयोगात सहभागी होणं म्हणजे मी माझा दर्जा कमी करणं असेल आणि नाही. मी पैशासाठी माझा दर्जा कमी करू शकत नाही.’

इतकेच काय तर केतकी पुढे बोलताना असंदेखील म्हणाली कि, ‘बिग बॉसमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांना उधाण दरवर्षी पूर्ण विराम द्यावा लागतो. प्रत्येक वेळी जर कोणी मला बिग बॉसमधील सहभागाबद्दल विचारत असेल त्यांना मी सांगेन कि, एक रुपया एपिलेप्सी संशोधनासाठी दान केला असता तर आत्तापर्यंत आपल्याकडे स्टाफची सोय झाली असती. इतकेच नव्हे तर वृत्त माध्यमांनी विशेषत: बिग बॉस संदर्भात माझं नाव छापताना प्रत्येक वेळी हजार रुपये दान केले पाहिजेत.’