Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

चितळे बाई जोरदार! केतकीला मिळाला सोशल मीडिया Access; आता पुढे काय होणार..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 29, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Ketaki Chitale
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मराठी मालिका मनोरंजन विश्वातील अभिनेत्री केतकी चितळे ही आपल्या अभिनयापेक्षा जास्त वादग्रस्त विधाने, आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट या प्रकरणामुळेच चर्चेत राहिली आहे. काही महिन्यांपूर्वी तिने फेसबुकवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर करत चिखल फेक केली होती. ज्याचं परिणाम तिने कोठडीचा पाहुणचार घेऊन चांगलाच उपभोगला आहे. या प्रकारामुळे तिला सोशल मीडिया हॅण्डल वापरण्यास सक्तीची मनाई होती. यानंतर मोठ्या ब्रेकनंतर तिला तिचं स्वातंत्र्य परत मिळालं आहे. होय. हे स्वातंत्र्य म्हणजे, केतकीला तिच्या सोशल मीडिया हॅण्डलचा अधिकृत अँक्सेस देण्यात आला आहे यामुळे आता पुन्हा व्यक्त होण्यासाठी केतकी सज्ज आहे.

यानंतर आता आपल्या सोशल मीडिया ॲक्टिवेशनचा आनंद केतकीने आपल्या चाहत्यांसह शेअर केला आहे. एक पोस्ट शेअर करत केतकीने म्हंटले आहे की, ‘मला फायनली माझं फेसबूक अॅक्सेस मिळालं आहे. सध्याच्या घडीला का होईना ते पुन्हा मिळालं आहे याचं समाधान आहे.’ काही तासांपूर्वीच तिने ही पोस्ट शेअर केली आहे. पण या पोस्टवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे काही तासांतच तिची पोस्ट ट्रेंडींग ठरली आहे. यावर अनेकांनी तिचे अभिनंदन केले आहे तर काहींनी काळजी घे गं असे म्हंटले आहे.

केतकी चितळे ही अभिनेत्री आपल्या परखड, स्पष्ट आणि बेधडक स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असते. यामुळे अनेकदा तिला ट्रोलदेखील व्हावं लागलं आहे. इतकंच काय तर परिकियांसोबत तिला आपल्या लोकांचाही राग सहन करावा लागला आहे. पण थांबेल ती केतकी कुठली… ती सतःच मत विविध पद्धतीने मांडत राहते. मग काहीही होऊदे.. केतकीच्या अशाच स्वभावामुळे अनेकदा वादंग निर्माण झाले आहेत. पण पवारांवरील आक्षेपार्ह पोस्टमुळे केतकीला चांगलाच धडा मिळाला. आता प्रश्न एव्हढाच की, सोशल मीडिया अँक्सेस मिळाल्यानंतर केतकी पुढील प्रवास कसा करते. सध्या अनेकांचं लक्ष तिच्या आगळी भूमिकेकडेच लक्ष आहे. ती पुन्हा वादग्रस्त पोस्ट शेअर करून समाजात तेढ निर्माण करून वातावरण दुषित करणार नाही याची काळजी घेण्यासाठी सायबर सेलची तिच्यावर बारीक नजर आहेच. आता केतकी काय करते.. हे पाहणे मात्र उत्सुकता वाढवणारे आहे.

Tags: Facebook OfficialInstagram AccountKetaki ChitaleMarathi Actresstv actress
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group