Take a fresh look at your lifestyle.

लाळ आणि तळवे चाटणाऱ्यांचीच तू; पवारांवर शिंथोडे उडविणाऱ्या केतकीवर टीकांचा पाऊस

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री केतकी चितळे हि याआधीही अनेक प्रतिक्रिया, पोस्ट आणि वक्तव्यांसाठी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यानंतर आता मात्र बाईंनी कहरच केला. लहान तोंडी मोठा घास घेत तिने थेट राजकीय फळ्या पार केल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. यामुळे आधीच तिच्यावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे केतकी यावेळी फक्त वादात नाही तर कायद्यातही चांगलीच अडकणार आहे हे स्पष्ट दिसत आहे. यानंतर आता नेटकरी थोडीच शांत बसणार आहेत. एकतर राष्ट्रवादी समर्थकांनी अक्षरशः शिवीगाळ करीत तिच्यावर राग व्यक्त केला आहे. तर अन्य नेटकाऱ्यानी तिच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे. याशिवाय उरलेले मजा घेण्यात व्यस्त आहेत.

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक अकाउंटवरुन शरद पवारांची खिल्ली उडविणारे काव्य पोस्ट केले आहे. तिने पवारांवर शिंथोडे उडविण्याचा प्रयत्न केला असता तिचे ट्रोल होणे अतिशय सामान्य बाब आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे की,
तुका म्हणे पवारा । नको उडवू तोंडाचा फवारा II
ऐंशी झाले आता उरक । वाट पहातो नरक II
सगळे पडले उरले सुळे । सतरा वेळा लाळ गळे II
समर्थांचे काढतो माप । ते तर तुझ्या बापाचेही बाप II
ब्राह्मणांचा तुला मत्सर । कोणरे तू ? तू तर मच्छर II
भरला तुझा पाप घडा | गप! नाही तर होईल राडा II
खाऊन फुकटचं घबाड । वाकडं झालं तुझं थोबाड ||
याला ओरबाड त्याला ओरबाड । तू तर लबाडांचा लबाड || अशा आशयाची हि पोस्ट अभिनेत्रीकडून करण्यात आली आहे. यानंतर सोशल मीडियावरील वातावरण चांगलाच पेटलं आहे. अनेकांनी तिला शिवीगाळ करीत तिच्या पोस्टचा निषेध केलाय. तर काहींनी अगदी तिचे संस्कारही काढले आहेत. इतकेच नव्हे तर काहींनी तिला स्वयंघोषित अभिनेत्री सुद्धा म्हटले आहे.

Ketaki Chitale Trolled

या पोस्टवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिले कि, तू तर चितळेची मिनी बाकरवडी… ओळखत तरी कुणी तुला.. एक मालिका केली अणि स्वतःला समजायला लागली गल्लीतली सेलेब्रिटी… तर आणखी एकाने लिहिले आहे कि, मुजरा करनारी आहे तू तर कोठे गेले तुझे संस्कार, पवार साहेबाना असे वक्तव्य. आमचा जाहीर निषेध! आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, पागल झाली आहे. तर आणखी एकाने लिहिले कि, हिंदू धर्माची शिकवण आहे म्हणतात, ज्या व्यंगावरून तुम्ही एखाद्याला चिडवाल तेच व्यंग आपल्याला होते…..असो……लाळ आणि तळवे चाटणाऱ्यांचीच तू……तुझ्याकडून वेगळी अपेक्षा नाहीच….. याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने लिहिलंय कि, फेमस होण्याचा केविलवाणा प्रयत्न. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, वार्धक्य, आजारपण कुणाला चुकलेलं नाही.. पण याला सोबत घेऊन जनतेसाठी काम करणं सोपं नाही.. अशा व्यक्तीवर बाजारू, बिकाऊ, नि अल्प बुध्दीवाल्यांनी बोलू नये.. अशा प्रकारे नेटकऱ्यांनी केतकीवर टीकेची झोड उठवली आहे.