Take a fresh look at your lifestyle.

चाहत्यांनी स्वत: बनवला KGF 2 चित्रपटाचा ट्रेलर; पहा व्हिडिओ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । केजीएफ हा दाक्षिणात्य सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमाचा दुसरा भाग कधी येईल या प्रतीक्षेत सिनेमाचे चाहते आहेत. हा सिनेमा जुलै महिन्यात प्रदर्शित होणार होता. मात्र आता ही तारीख ऑक्टोबर २०२० ला प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘केजीएफ चॅप्टर – १’ हा आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय दाक्षिणात्य चित्रपटांपैकी एक आहे. सुपरस्टार यश अभिनित केजीएफने दोन आठवड्यांत तब्बल २०० कोटी रुपयांची कमाई केली होती.

चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये भरपूर आहे. आता चाहते केजीएफच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहात आहेत. परंतु निर्मात्यांकडून या चित्रपटाबद्दल कुठलीही अपडेट मिळालेली नाही. परिणामी दुसऱ्या भागासाठी आतुर झालेल्या चाहत्यांनी स्वत:च KGF 2चे ट्रेलर तयार केले आहेत. हे फॅनमेड ट्रेलर सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.  KGF 2 मध्ये अभिनेता संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारणार आहे. काही महिन्यांपूर्वी संजय दत्तने या आगामी चित्रपटाचा पोस्टर शेअर करुन याबाबत माहिती दिली होती.

दुसरा भागाचा आवाका पहिल्या भागापेक्षाही अधिक मोठा असेल असं अभिनेता यशने सांगितलं होतं. त्या अनुशंगाने सध्या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु आहे. हा चित्रपटही पहिल्या भागाप्रमाणेच हिंदी, तामिळ आणि कन्नड या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होईल. मात्र हा विलंब चाहत्यांच्या सहनशक्तीच्या पलिकडे गेला आहे. परिणामी त्यांनी स्वत:च ट्रेलर तयार करुन युट्यूबवर प्रदर्शित करण्यास सुरुवात केली आहे. जरी चाहत्यांनी ट्रेलर बनविला असला तरी चित्रपटाची नेमकी कथा ऑक्टोबरमध्येच पाहायला मिळणार आहे.