Take a fresh look at your lifestyle.

KGF 2 ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित; जबरदस्त अॅक्शन ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कन्नड सुपरस्टार यशचा बहुचर्चित चित्रपट ‘KGF 2 हा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. याचा ट्रेलर अलीकडेच रिलीज झाला असून सोहळा मीडियावर त्याचीच चर्चा आहे. या चित्रपटात यशसोबत बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार पाहायला मिळत आहेत. यात संजय दत्त, रवीना टंडन, प्रकाश राज हे कलाकार आहेत. तर चित्रपट निर्माता करण जोहर याने चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली होती. KGF च्या यशानंतर त्याच्या दुसऱ्या भागाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. हा चित्रपट येत्या १४ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

सुपरस्टार यशचा ‘KGF – 2’ कधी रिलीज होणार अशी सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर आता हा चित्रपट प्रदर्शित होणार असून एप्रिल गाजवणार हे नक्की झाले आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या ट्रेलर व्हिडिओमध्ये तुम्ही यशच्या कमाल अॅक्टिंगची झलक पाहू शकता. तर सजू बाबाचा लूक एकदम जबरी बोले तोह किलर आहे. या चित्रपटात संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर अभिनेत्री रवीना टंडन हि रामिका सेन नामक भूमिकेत दिसेल. हि भूमिका एका राजकीय नेत्याची आहे. तसेच चित्रपटातील अॅक्शनची एक छोटीशी झलक या ट्रेलरमध्ये दिसतेय. हा चित्रपट एक फुल्ल पॅकेज असल्यामुळे बॉक्स ऑफिसवरही कमाल करणार यात काही शंकाच नाही.

KGF – 2 च्या ट्रेलरला आतापर्यंत पाच कोटीपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. या ट्रेलरच्या कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी उत्सुक होत विविध कमेंट केल्या आहेत. यातील अधिकाधिक लोकांनी या सिनेमाबाबत आपण उत्सुक आहोत असे सांगितले आहे. तर अनेकांनी आपण यशचे फॅन असल्याचे म्हटले आहे. तर अनेकांनी चित्रपट रिलीज होण्याआधीच हिट होणार अशी घोषणा केली आहे. लोकांची उत्सुकता पाहता KGF चॅप्टर 2 कडून प्रेक्षकांची मोठी अपेक्षा आहे हे समजते आहे. आता पहिल्या भागावरून दुसरा भाग नक्कीच दमदार असेल अशी आशा आहे. मात्र हा चित्रपट पाहिल्यावरच उकल सुटेल एव्हढं नक्की.