Take a fresh look at your lifestyle.

‘हिट है, भाई हिट है, रॉकी भाई हिट है! KGF Chapter 2’ची पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। KGF या चित्रपटाने प्रेक्षकांनी मने जिंकल्यानंतर भरगोस यश प्राप्तीनंतर आता KGF २ सुद्धा याच मार्गावर आहेत. पहिल्या भागानंतर ‘केजीएफ चॅप्टर २’च्या प्रतिक्षेत असणाऱ्या प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आणि ‘केजीएफ चॅप्टर २’ने जबरदस्त एंट्री केली. या चित्रपटाने रिलीज होतास बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. ‘केजीएफ’ सारखाच ‘केजीएफ चॅप्टर २’सुद्धा प्रेक्षकांना भावला आहे. त्यात सुपरस्टार यशची एंट्री तर इतकी भारी आहे कि बस्स.. त्याचा लूक त्याची स्टाईल सगळंच कमाल. यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी अतिशय खास आहे. म्हणूनच पहिल्याच दिवशी या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत कोट्यवधींचा आकडा पार केलाय.

‘केजीएफ चॅप्टर २’ चे बजेट दीडशे कोटी आहे. तर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बजेट कमाई केली आहे. ‘केजीएफ चॅप्टर २’ने पहिल्याच दिवशी १५० कोटी रुपयांची जबरदस्त कमाई केली आहे. रिपोर्टनुसार, कन्नडमध्ये ३५ कोटी, तामिळमध्ये १२ कोटी, केरळमध्ये ७.५० कोटी, ऑनलाईनहून ५२ कोटी रुपये असं एकूण मिळून ‘केजीएफ चॅप्टर २’नं पहिल्याच दिवशी १५० कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता यश, बॉलिवूड अभिनेता संजय दत्त, अभिनेत्री रवीना टंडन यांच्या मुख्य भूमिका असून त्यांनी या भूमिका अव्वल रित्या साकारल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात हा चित्रपट यशस्वी झाला आहे.

सगळ्यात महत्वाची आणि विशेष बाब म्हणजे ‘केजीएफ चॅप्टर २’ या चित्रपटाला तुफान करण्याची विशेष संधी मिळाली आहे. एकतर कोरोनाचे सर्व निर्बंध राज्यात हटवले आहेत. शिवाय आंबेडकर जयंतीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे शो हे सलग पुढे गुड फ्रायडे, बैसाखी आणि रविवार अशा लॉन्ग वीकेंडमध्ये लागणार आहेत. त्यामुळे १००% फायदा ‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपटाला होणार. सध्या सोशल मीडियावर ‘केजीएफ चॅप्टर २’ची चर्चा तर आहेच. शिवाय चित्रपटाच्या शेवटी ‘केजीएफ चॅप्टर ३’ची घोषणा केल्याचे अनेकांनी म्हटले आहे. त्यामुळे सध्या KGF २- ३ दोन्ही चर्चेत आहेत.