Take a fresh look at your lifestyle.

अमृता खानविलकरचा स्टंट पाहून तिची आई झाली अवाक

हॅलो बॉलिवूड ऑनलाइन । मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याच्या घडीला असलेली सगळ्यात एनर्जेटिक अभिनेत्री कोण? असा प्रश्न विचारल्यावर सर्वांच्या मनात अभिनेत्री अमृता खानविलकर हेच नाव येते. अमृता मराठी चित्रपटांप्रमाणेच बॉलिवूड चित्रपटातही झळकत असते. केवळ चित्रपटचं नाही तर अनेक मालिका आणि रिऍलिटी शोमध्येही तिने तिचा दबदबा निर्माण केला आहे. सध्याला मात्र या अभिनेत्रीने तिच्या आईच्या जीवाला घोर लावला आहे. अमृताच्या आईचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्यांनी अमृताचा स्टंट पाहून डोक्याला हातच लावला आहे.

अमृता ‘खतरों के खिलाडी’च्या १० व्या सिझन मध्ये सहभागी झाली आहे. या शोमध्ये सहभागी होणारी अमृता ही मराठी चित्रपटसृष्टीतील पहिली अभिनेत्री ठरली. काही दिवसापूर्वीच सुरु झालेल्या या पर्वामध्ये अमृता वेगवेगळे स्टंट करताना दिसत आहे. त्यामुळे तिची जोरदार चर्चा सगळीकडे सुरु आहे.मात्र ती ज्या जिद्दीने अंगावर शहरे आणणारे स्टंट करत आहे ते पाहून तिच्या आईने चक्क डोक्याला हात लावल्याचं दिसून येत आहे.

‘खतरों के खिलाडी’चा हा भाग प्रसारित झाल्यानंतर तिच्या आईने तो पाहिला. यामध्ये अमृता जीव घेणा स्टंट करत होती. हा स्टंट पाहिल्यावर अमृताची आई थबकून गेली आणि त्यांनी आपल्या डोक्यालाच हात लावला. अमृताने तिच्या आईचे हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

“मी आयुष्यात कधी असं काही करेन याचा विचारही केला नव्हता. मात्र हा स्टंट पाहिल्यानंतर माझ्या आईच्या चेहऱ्यावर जे भाव होते ते पाहिल्यावर तिला नक्कीच माझा अभिमान वाटत असेल असं मला जाणवलं. धर्मेश, जर तू नसतास तर माझं काय झालं असतं”, असं कॅप्शन अमृताने या व्हिडीओला दिलं आहे
दरम्यान, अलिकडेच अमृताचा ‘चोरीचा मामला’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलेल्या अमृता राझी, मलंग या हिंदी चित्रपटानं मध्येही चित्रपटात झळकली आहे.