Take a fresh look at your lifestyle.

माने प्रकरणाला राजकीय वळण येणार?; अभिनेता किरण मानेंची थेट शरद पवारांसोबत ग्रेट भेट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विविध राजकीय आणि सामजिक विषयांवर प्रखर भूमिका घेणारे अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ मालिकेतुन बाहेर काढल्यानंतर सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान आपण घेत असलेल्या राजकीय भूमिकांमुळेच आपल्याला मालिकेतून काढण्यात आले असा आरोप किरण माने यांनी केला होता. त्यावर निर्मात्यांनी व्यावसायिक कारणामुळे मानेंना मालिकेतून काढल्याचे स्पष्टीकरण दिल आहे. यानंतर आता किरण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकारणात आणखीच खळबळ उडाली आहे.

 

मराठी अभिनेते किरण माने हे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील नामक भूमिका बजावत होते. हि भूमिका लोकांना अतिशय आवडत होती. लोकांनी किरण माने यांच्या भूमिकेवर भरपूर प्रेम केले. मात्र त्यांना मालिकेतून तडकाफडकी काढुन टाकल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. राजकीय विषयांवर भाष्य केल्यामुळेच मला काढून टाकण्यात आले असा आरोप माने यांनी केला होता. यानंतर आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. माहितीनुसार मानेंची पवारांसोबत तब्बल दिड तास चर्चा झाली. या चर्चेत नक्की काय निष्पन्न झाले हे अद्याप कळू शकलेले नाही. माध्यमांसोबत बोलताना मानेंनी आपली भेट आशावादी झाल्याचे सांगितले.

माझी बाजू मी शरद पवार यांच्या समोर मांडली आहे. माझ्यावर जो अन्याय झाला आहे त्याबाबत शरद पवार यांच्याशी बोलायला हवं असं मला वाटलं आणि म्ह्णून मी आज इथे येऊन त्यांची भेट घेतली असे किरण माने यांनी सांगितले. तर शरद पवार यांनी माझी बाजू सविस्तरपणे ऐकून घेतली आणि आमच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली. मला आशा आहे मला न्याय मिळेल. अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पण यानंतर भेटणार आहे. असे ते म्हणाले. भाजप खासदार उदयनराजे भोसले सध्या गोव्यात असल्यामुळे त्यांची भेट झाली नाही. मात्र लवकरच यांचीही भेट आपण घेणार आहोत असे किरण माने यांनी सांगितले.