Take a fresh look at your lifestyle.

‘लै लै लै भारी वाटतंय’; ‘मुलगी झाली हो’ मालिकेचा जबरदस्त टीआरपी पाहून किरण मानेंनी व्यक्त केला आनंद

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका सृष्टीतील लोकप्रिय मराठमोळे अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात यात काही वादच नाही. कारण किरण मानेंनी पोस्ट टाकली आणि ती व्हायरल झाली नाही असे काही होत नाही. ते नेहमीच फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. अगदी कालपरवाच त्यांची एक पोस्ट व्हायरल झाली असताना आता आणखी एक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. अभिनेता किरण माने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील नामक भूमिका साकारत आहेत. त्यांची ही भूमिका इतकी लोकप्रिय आहे कि लोक त्यांना किरण नव्हे तर विलास याच नावाने ओळखू लागली आहेत. शिवाय या मालिकेचा टीआरपी चांगलाच अव्वल आहे. यामुळे टीआरपी लिस्टमध्ये या मालिकेने पहिला आणि तिसरा नंबर पटकावला आहे. हे पाहून किरण मानेंच्या पोटात आनंद काही मावला नाही आणि त्यांनी एक भन्नाट आनंद व्यक्त करणारी पोस्ट लिहिली आहे.

या पोस्टमध्ये किरण माने यांनी लिहिले कि, ‘टाॅप थ्री’ मधल्या ‘नंबर वन’ आणि ‘नंबर थ्री’ वर आपली सिरीयल आनि आपला फोटो बघून स्वप्नात असल्यागत वाटतंय भावांनो ! लै लै लै भारी वाटतंय ! …टी.व्ही.वरच्या चिकन्याचुपड्या, ग्लॅमरस चेहर्‍यांमध्ये आपल्यासारख्या गावरान, साध्या, सावळ्या चेहर्‍याला कधी ठसठशीत वाव मिळंल असं वाटत नव्हतं.. मिळाला तरी कुनी भाव देईल अशीही शक्यता वाटत नव्हती… अनुभवबी तसेच आले होते… म्हनून आपल्यातल्या अभिनेत्याला फक्त नाटक आणि सिनेमा ही दोन माध्यमंच न्याय देतील, टीव्हीनं चेहर्‍याला ओळख दिली तरी लै झालं असं समजून संघर्ष सुरू होता.. पन आज या ‘टीआरपी’ लिस्टमध्ये, सगळ्या ग्लॅमरस चकचकीत चेहर्‍यांच्या मांदियाळीत सगळ्यात ‘टाॅप’ला, दोन ठिकाणी आपला साधासुधा चेहरा बघून, हे सगळे समज मोडीत निघाले गड्याहो. हा चेहरा माझा नाय भावांनो… महाराष्ट्रातल्या ग्रामीन भागातल्या, अभिनेता होन्याची स्वप्नं बघनार्‍या प्रत्येक पोराचा हाय !

.. स्टार प्रवाहनं मला अनपेक्षीत जगावेगळी संधी दिली आणि एका वर्षात माझी दुनियाच बदलून गेली !!! विलास पाटील हा तगडा-नादखुळा-जबराट आनि वैविध्यपूर्ण छटा असलेला रोल माझ्या संघर्षाचं सोनं करून गेला… पटकथालेखिका रोहीणी निनांवेंनी माझं नांव सुचवलं त्याला सतीश राजवाडे, विराज राजे, अंकिता तावडेंनी होकार दिला…रोहीणी निनांवेंच्या अफलातून स्क्रीनप्लेनं आनि मिथिला सुभाष यांच्या खतरनाक डायलाॅग्जनी विलासच्या व्यक्तीमत्त्वातले अनेक बारकावे-कंगोरे अधोरेखीत केले..एक वर्ष उलटून गेलं पन अजूनबी तितकीच रसरशीत वाटतीये ही भुमिका.. लै लै लै मज्जा येतीय काम करताना आजबी ! टी.व्ही मालिकांविषयीची माझी सगळी मतं किमान या मालीकेनं तरी खोडून काढली…ही मालिका घराघरात किती लोकप्रिय झालीय याचा अनुभव रोज घेतोय.. आजच्या टीआरपीनंही त्यावर शिक्कामोर्तब केलं !

…दोस्तांनो, मी यावरच समाधानी र्‍हानार नाय.. ही फक्त एक झलक हाय.. सुरुवात हाय.. अजून लै रान हानायचंय..लै काय काय करायचंय.. लै ‘ड्रीम रोल्स’ वाट बघतायत.. पन त्या प्रवासातल्या ह्या टप्प्यावरच्या यशाचा आनंद तुमच्याबरोबर शेअर करायला भारी वाटतंय..कारन हे हाय ते तुमच्यामुळं हाय.. तुमी कितीबी डोक्यावर घेतलं तरी माझी मुळं आनि पाय ह्या मातीत घट्ट असनार, याची खात्री बाळगा ! मनापासुन आभार! – किरण माने.