Take a fresh look at your lifestyle.

‘बदनामी’ हे पाताळयंत्री बांडगुळांचं मुख्य जाळं; NCB’ला टोले लगावत मानेंकडून शाहरुखचे समर्थन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबई कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानविरोधात पुरावे नसल्याचे सांगून आर्यन खान याला निर्दोष म्हणून सोडण्यात आले आहे. आर्यन हा अमली पदार्थांच्या कटाचा किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटचा भाग होता याचा कोणताही पुरावा नाही, असं वृत्त समोर आल्यानंतर पुन्हा एकदा बसलेलं वादळ वेगाने उठलं आहे. या दरम्यान सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘पठाण’चा फर्स्ट लूक देखील प्रदर्शित झाला आहे. सोबतच चित्रपट कधी रिलीज होणार हे देखील घोषित केले आहे. यावर किरण मानेंनी फेसबुक पोस्ट लिहीत शाहरुख आणि आर्यन यांना समर्थन दिले आहे. NCB ला टोला देत किरण मानेंनी लिहिलेली हि पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

मराठी अभिनेता किरण माने यांनी शाहरुख आणि आर्यनचे समर्थन करणारी मात्र NCB अधिकाऱ्यांच्या विरोधात बोलणारी तडफदार पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये मानेंनी लिहिले कि, आपल्या शारख्याचा ‘पठान’ पिच्चर लागंल तवा लागंल.. आज मात्र त्यानं व्यवस्थित पठान लावला. संविधानिक मार्गानं !
एन.सी.बी नं सखोल चौकशी करून आर्यन खानला निर्दोष जाहीर केलेलं हाय. आर्यनकडं कुठलाच अंमली पदार्थ सापडला नाय आनि त्याचा कुठल्याबी आंतरराष्ट्रीय ड्रग गँगशी संबंध असल्याचा पुरावाबी सापडला नाय….कटकारस्थान्यांनी गळ्यात पट्टा बांधून पाळलेले सरकारी अधिकारी किती भिकारचोटपना करत्यात आनि त्यांची विषारी पिलावळ अशा भुरट्या अधिकार्‍यांना ‘सिंघम’ , ‘सिंघम’ करत कसं डोक्यावर नाचवत्यात याचं ढळढळीत उदाहरन हाय हे !

पुढे लिहिले कि, ‘बदनामी’ हे या पाताळयंत्री बांडगुळांचं मुख्य जाळं हाय भावांनो… समजून घ्या. हज्जारो वर्षांपास्नं विरोधकांना या जाळ्यातच अडकवत आलेत हे. ‘आमचा विरोध कराल तर बदनाम करू.’ असा संदेश द्यायचा असतो यांना. त्या बदनामीच्या भितीच्या चिंध्या करून निडरपने पुढं जानारा वाघ एखादाच असतो.. मग त्यो त्यांच्या बापाच्याबी सापळ्यात सापडत नाय! शाहरूख, लब्यू भावा. – किरण माने. अशा आशयाची पोस्ट लिहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर एकाने लिहिले कि, समीर दाउद वानखेडेच्या औलादींची तळमळ आणि तडफडणवीस झाली असंल …… याशिवाय आणखी एकाने लिहिलं कि, अगदी योग्य मत मांडलेत फेकू आणि तडीपारचे सूडाचे राजकारण याचा अंत तर होणारच..