Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

महिलांशी गैरवर्तSSSन..?; गंभीर आरोपांची मालिका पाहता किरण मानेंची तोफ पुन्हा कडाडली

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 17, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kiran Mane
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता किरण माने हे स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील हि भूमिका साकारत होते. या भूमिकेला लोकांनी प्रचंड प्रेम दिले आणि देत होते. मात्र तरीही चॅनेलने तडकाफडकी किरण मानेंना मालिकेतून काढून टाकले आणि नव्या वादाला तोंड फुटले. यानंतर आपल्या राजकीय भूमिकांमुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप मानेंनी केला होता. त्यावर मालिकेतील काही महिला सहकलाकारांनी सांगितले कि त्यांचे आमच्यासोबत वर्तन चांगले नव्हते. तर अन्य काही महिला सहकलाकारांनी सांगितले कि त्यांनी आमच्यासोबत कधीच गैरवर्तन केले नाही. यानंतर हे प्रकरण आणखीच चिघळलं. मात्र किरण माने यांनी आपली भूमिका कायम ठेवत आपल्यावरील आरोपांना कडक प्रत्युत्तर देत एक फेसबुक पोस्ट केली. हि फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

किरण माने यांनी लिहिले कि, “महीलांशी गैरवर्तन करत होता तोSSS महिलांशी गैरवर्तSSSन… म्हणजे दूसरं काय अशणाSर? ‘तसलंच’ काहीतरी अशणार !!!” प्रद्युम्न जोरजोरात किंचाळत होता… मानसोपचार तज्ञ प्रसन्न सहस्त्रबुद्धे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी त्याचे हातपाय घट्ट धरून ठेवले… काॅटला बांधले… शेवटचा पर्याय म्हणून त्याला शाॅक दिला ! …”डाॅक्टर काय झालंय माझ्या पदूला? गेले दहा दिवस शाखेत जाणं टाळतोय. फक्त ‘कोण हा फडतूस किरण माने? काळं कुत्रं तरी विचारतं का त्याला?’ असं म्हणत मोबाईलमध्ये सतत ‘किरण माने’ असं टाईपत सर्च करत असतो..त्याला बरा करा हो!” असं म्हणून तोंडात पदराचा बोळा कोंबुन प्रद्युम्नची आई ढसाढसा रडू लागली…डाॅ. प्रसन्न सहस्त्रबुद्धे त्यांना पाणी देत म्हणाले,”हे बघा. रडू नका नक्की झालं काय? हे सविस्तर सांगा.”

View this post on Instagram

A post shared by PeepingMoon Marathi News (@peepingmoonmarathi)

…प्रद्युम्नचे बाबा सांगू लागले. “अहो ‘किरण मानेंचे महिलांशी गैरवर्तन’ अशी हेडलाईन वाचून प्रद्युम्न आणि त्याच्या मित्रमंडळींमध्ये जल्लोष चालला होता. सगळे म्हणाले “आता सापडला बेटा ! आमच्या विचारधारेशी पंगा घेणं सोपं नाही.. भलेभले संपवलेत आम्ही. रस्त्यावर आणूया साल्याला.”… डाॅक्टर हलकंसं हसले आणि म्हणाले, “हम्..पुढे बोला.”… “तर जेव्हा त्या तीन महिलांच्या तक्रारी सुरू झाल्या.. तेव्हा प्रद्युम्न, चिन्मय, तन्मय, केशव, वेदांत सगळे घरी जमले..फटाके वगैरे आणले..टीव्हीवर त्या महिला सांगू लागल्या की “किरण माने स्वत:ला हिरो समजायचा.”.. तन्मय वैतागून म्हणाला,”अगं होताच तो हिरो… तू पुढे मुद्याचं बोल.”.. नंतर त्या तिघींचे आरोप सुरू झाले… “आम्हाला टोमणे मारायचा.. ॲरोगन्ट वागायचा… वगैरे वगैरे..” प्रद्युम्न आणि मंडळींची चुळबूळ सुरू झाली..”मुद्याचं कुणीच बोलेना रे ! आपण इयत्ता पाचवी ड मध्ये अशा तक्रारी करायचो.” … तेवढ्यात हिराॅईन म्हणाली, “मला अपशब्द वापरायचा.”… प्रद्युम्न आणि गॅंग सरसावून बसली… पण ती त्यापुढे काही सांगेचना !

https://twitter.com/Princy_Vishu/status/1482677965318397952

पुढे, “अगं… अपशब्द वापरत होता तर त्याला त्याचवेळी थोबाडला का नाही त्याचवेळी??? पोलीस कम्प्लेन्ट का नाही केली ?? शेजारी ज्या वयोवृद्ध लढवय्या अभिनेत्री उभ्या आहेत त्या हे सगळं ऐकून कसं घेत होत्या?? या महिलांसाठी त्या वर्षभर स्टॅंड का घेत नव्हत्या??? आणि मग हे सांगायला पन्नास तास का लावले???? तोवर किरण माने फेमस झाला ना.. छ्या!! काही दमच नाही रे आरोपांमध्ये…” असे अनेक प्रश्न चिन्मतन्मयप्रद्युम्न गॅंगला सतावू लागले… मुलाखत संपली. नैराश्याचं वातावरण पसरलं.. तेवढ्यात शाखेच्या ग्रुपवर मेसेज आला… “ठीक आहे. ठोस काही हाती लागलं नाही. तरीही यावर आपण किरण मानेला बदनाम करत राहू. लागा कामाला..खाडखाडखाडखाड फेक अकाऊंटस् उघडली गेली.. प्रोफाईल लाॅक चार चार वेळा चेक केलं… आणि सुरू झालं…”किरण्या तुझा बाजार उठला रे……..”

पुढे, …तोवर संध्याकाळी ‘मुलगी झाली हो’ मध्ये काम करणार्‍या चार महिला टी.व्ही. वर आल्या आणि “किरण माने हा माणूस म्हणून अतिशय भला आहे. काडीचंही गैरवर्तन नाही. आमच्यावर मुलीसारखी माया करतात ते..” असं बोलू लागल्या आणि प्रद्युम्नमित्रमंडळींवर मोठ्ठा बाॅंब पडला… मेंदूवर आघात झाला… तन्मय म्हणाला, “च्यायला एक प्लॅन सक्सेसफुल होईना झालाय. आधी म्हणाले व्यावसायिक कारणामुळे काढलंय..नंतर म्हणाले महिलांशी गैरवर्तन..नंतर म्हणाले टाॅन्टिंग..आणि आता ते ही फसलं…”

…तन्मय हे बोलत असतानाच प्रद्युम्न चिन्मयच्या अंगावर कोसळला…चिन्मय चेंगरलाच.. कसातरी त्याला उचलुन हाॅस्पीटलमध्ये आणला… आणि… डाॅ. प्रसन्न सहस्त्रबुद्धे गोड माणूस ! ते प्रसन्न हसले. स्वत:शी म्हणाले “‘द्वेष’ हे सगळ्या अस्वस्थतेचं,चिंतेचं आणि त्यातून येणार्‍या विकृतीचं मूळ आहे… जातीद्वेष असो…धर्मद्वेष असो..वा व्यक्तीद्वेष असो… त्या विकृतीतून सुरू होते अर्वाच्य शिवीगाळ.. आणि याचं टोक म्हणजे कपट कारस्थान.. आणि याचा शेवट वैफल्य… उदासिनता.. मानसिक आरोग्याची हानी !! ‘द्वेष करणं’ म्हणजे स्वत: विष पिणं..आणि आपल्या शत्रूनं मरावं अशी अपेक्षा करणं !!!” …शुद्धीवर आलेल्या प्रद्युम्नच्या डोळ्यांत पाणी आलं… “तसा बरा ॲक्टर आहे किरण माने… पण…” पुन्हा मनात ‘त्या’ विचारांनी थैमान घातले… पुन्हा तो ओरडू लागला… डाॅक्टरांनी त्याच्याकडे धाव घेतली….. – किरण माने.

Tags: ControvercyFacebook PostKiran ManeMarathi ActorsMulgi Zali Ho Famestar pravahviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group