Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मांजरेकरांनी शब्द पाळला; ‘निरवधी’ चित्रपटात तेजस्विनी लोणारी आणि किरण माने झळकणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 2, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Niravadhi
0
SHARES
121
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचा चौथा सिजन गाजवलेले किरण माने आणि तेजस्विनी लोणारी दोघांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या सिजनचे विजेतेपद दोघेही मिळवू शकले नसले तरीही प्रेक्षकांसाठी हेच खरे विजेते आहेत. नुकतेच किरण माने यांचे गोव्याच्या बीचवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर आता किरण आणि तेजस्विनी लोणारी यांचे एकत्र फोटो व्हायरल होत आहेत. इतकेच काय तर तेजस्विनी मानेंसोबत लाईव्ह देखील आली होती.

View this post on Instagram

A post shared by Tejaswini Lonari (@tejaswinilonari)

किरण माने आणि तेजस्विनी लोणारी बिग बॉस मराठी सीजन ४ नंतर निवांत असे गोव्याच्या किनाऱ्यावर भटकताना दिसले आहेत. त्याच काय आहे, किरण आणि तेजस्विनी दोघेही एका चित्रपटात काम करत आहेत. महेश मांजरेकर यांच्या ‘निरवधी’ या चित्रपटात या दोघांचीही वर्णी लागली आहे आणि याच चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्ताने हे दोघे गोव्यामध्ये दाखल झाले आहेत. शुटिंगमुळे गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर मस्त फेरफटका मारण्यापासून ते सनसेटचा आनंद घेण्यापर्यंत विविध अनुभव घेण्याची संधी त्यांना मिळाली आहे. किरण माने आणि तेजस्विनी लोणारी यांची बिग बॉसच्या घरातली गट्टी आपण पाहिलीच. त्यांची केमिस्ट्री कमाल होती आणि हीच केमिस्ट्री आता लवकरच मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

या लाईव्ह सेशन दरम्यान तेजस्विनी आणि किरण यांनी सांगितले कि ‘लाईव्ह येण्याचं कारण.. आम्ही कामानिमित्त एकत्र आहोत… आम्ही एकत्र सिनेमा करतोय आणि आम्ही कुठे आहोत… तर आम्ही सुंदर बीचवर आहोत… आम्ही गोव्यात आहोत… आपण मुंबईत समुद्र पाहिला असेल… पण गोव्याच्या बीचची गोष्ट वेगळीच आहे. महेश मांजरेकर यांच्या निरवधी चित्रपटात आम्ही एकत्र काम करत आहोत आणि त्याच शूटिंग सध्या गोव्यात सुरु आहे. मांजरेकरांनी दिलेल्या शब्दानुसार त्यांनी आम्हला खूप चांगल्या भूमिका दिल्या आहेत.’ यामध्ये किरण माने यांनी चित्रपटाची स्टार कास्ट सांगताना सुबोध भावे, उपेंद्र लिमये, गौरी इंगवले या कलाकारांची नवे घेतली आहेत. शिवाय नव्या भूमिकेचा उत्साह आणि खूप दिवसांनी कॅमेरासमोर उभं राहिल्यावर झालेला आनंद त्यांनी व्यक्त केला आहे.

Tags: Instagram PostKiran ManeMahesh ManjrekarNiravadhiTejaswini LonariUpcoming Marathi Movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group