Take a fresh look at your lifestyle.

येऊ कशी तशी मी नांदायला – शकू मावशी बदलली?; शुभांगी गोखलेंच्या जागी किशोरी अंबियेंची एंट्री

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फार कमी काळात प्रेक्षकांची लाडकी मालिका ठरली. या मालिकेतील काही वळणांनी भले प्रेक्षकांना नाराज केले असेल पण तरीही पुन्हा एकदा मालिकेने आपल्या चाहत्यांना ओढून आणलेच. दरम्यान या मालिकेतील ओम, स्वीटू, मालविका, रॉकी, दादा साळवी, काका, काकू, चिन्या, नलु मावशी आणि शकू मावशी या प्रत्येक पत्राने प्रेक्षकांच्या मनात आपले असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. ओम स्वीटू ऐवजी स्वी आणि मोहितचे लग्न झालेले पाहून प्रेक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली. अजूनही मालिका अद्याप यातून उभारलेली नाही. इतक्यात आता शकू मावशी बदलल्यामुळे प्रेक्षक आणखीच नाराज झाले आहेत. परंतु किशोरी आंबिये यांनी स्वतःहून प्रेक्षकांची माफी मागितली आहे आणि सांभाळून घ्या अशी विनंती केल्याचे पाहायला मिळत आहे.

मालिकेतील सर्वांची लाडकी शकू मावशी अर्थात अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी येऊ कशी तशी मी नांदायला हि मालिका सोडली आहे. आता त्यांच्या जागेवर सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील एक लोकप्रिय चेहरा दिसतोय. झी मराठी या इन्स्टा पेजवर याबद्दल माहिती देण्यात आली असून शुभांगी गोखले मालिकेतून एक्झिट घेणार आहेत हे सांगण्यात आले आहे. आता सर्वांना प्रश्न पडला आहे की या मालिकेत शकू मावशीची जागा कोण घेणार? तर लवकरच या मालिकेत शकू मावशीची भूमिका स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील अंजीची आई म्हणजेच अभिनेत्री किशोरी अंबीये यांनी घेतली आहे. मात्र नेटकऱ्यांनी या भूमिकेला शुभांगी गोखलेच योग्य न्याय देत असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान किशोरी अंबीये यांच्याकडून अधिकृत विधान करण्यात आल नसल तरीही या प्रोमोमध्ये किशोरी दिसत आहेत. शिव्या या प्रोमोवर त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करीत लिहिले कि, सॉरी प्रियजन, पण मलाही सांभाळून घ्या. यासोबतच येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या टीमकडूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु झी मराठीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोत शुभांगी गोखले नव्हे तर त्यांच्या लुकमध्ये किशोरी अंबीये दिसत आहेत. व्हिडीओच्या सुरूवातीला शुभांगी गोखले यांच्यासोबतच मालिकेचे पोस्टर दाखवण्यात आलं आहे.